फक्त ७५० रुपयांमध्ये मिळेल गॅस सिलेंडर; २८ हून अधिक शहरांमध्ये उपलब्ध

सध्या महागाईने उच्चांक गाठला असून गॅस सिलेंडरच्या किमती सुद्धा गगनाला भिडल्या आहेत. सरकारी मालकीची तेल कंपनी इंडनने सर्वसामान्यांसाठी एक खास सुविधा सुरू केली आहे. ज्यामध्ये सर्वसामान्यांना गॅस सिलेंडर स्वस्तात मिळू शकेल. इंडेनच्या या सुविधेअंतर्गत फक्त ७५० रुपयांमध्ये गॅस सिलेंडर सर्वसामान्य लोकांना उपलब्ध होईल. म्हणजेच तुम्हाला गॅस सिलेंडर जवळपास ३०० रूपयांनी स्वस्त मिळेल.

( हेही वाचा : वाहतूक कोंडीची समस्या सुटणार; पुण्यातील चांदणी चौकात होणार सहापदरी मार्ग)

७५० रुपयांत सिलेंडर

सरकारी मालकीची तेल कंपनी इंडेनने ग्राहकांसाठी कंपोझिट सिलेंडरची सुविधा सुरू केली आहे. हा सिलेंडर घेण्यासाठी तुम्हाला फक्त ७५० रुपये खर्च येईल. या सिलेंडरचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही हे सिलेंडर एका ठिकाणाहून दुसऱ्या जागी सहज ट्रान्सफर करू शकता. या सिलेंडरचे वजन सामान्य सिलेंडरपेक्षा कमी असते.

सध्या गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमतीमुळे नागरिक त्रस्त आहेत. सध्या १४.२ किलोच्या सिलेंडर किंमत १०५३ रुपये आहे. अशा परिस्थितीत घरगुती गॅस वितरक कंपनी इंडेन तुम्हाला ७५० रुपयात सिलेंडर देते.

कंपोझिट सिलेंडर म्हणजे काय?

कंपोझिट सिलेंडर हे वजनाने हलके असतात. यामध्ये तुम्हाला १० किलो गॅस मिळतो. त्यामुळे या सिलेंडरची किंमत कमी असते. या सिलेंडरचे वैशिष्ट्य म्हणजे ते पारदर्शक असतात, सध्या हे सिलेंडर २८ हून अधिक शहरांमध्ये उपलब्ध आहेत. कंपनी लवकरच हे सिलेंडर सर्व शहरांमध्ये उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here