Gas Leak: रत्नागिरीत विषारी वायूगळतीची मोठी दुर्घटना, ३० ते ४० विद्यार्थ्यांना बाधा  

77
रत्नागिरी जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली आहे. जिंदाल कंपनीमधून (Jindal Company) वायु गळती झाल्याने अनेक शाळकरी विद्यार्थ्यांना त्रास झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जवळपास ३५ ते ४० विद्यार्थ्यांना वायुगळतीमुळे त्रास होत आहे. संबंधित प्रकार समोर आल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे काही विद्यार्थ्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात, तर काहींना खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.  (Gas Leak)
जिंदाल कंपनीच्या टाक्यांचा मेंटेनन्स सुरू असताना गॅस लिकेज (Jindal Compani Gas leakage) झाल्याचा संशय आहे. या प्रकरणी आता प्रशासनाकडून युद्ध पातळीवर सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. संबंधित घटना नेमकी का घडली आणि ती पुन्हा घडू नये, यासाठी काय-काय काळजी घेतली जाणार? हे पाहणं आता महत्त्वाचं आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी, अशी प्रार्थना त्यांचे आई-वडील आणि रत्नागिरीतील (Ratnagiri Jindal Company) सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे.

(हेही वाचा – अमित शाहांनी घेतली Sharad Pawar यांची भेट; राजकीय चर्चांना उधाण)

दरम्यान, रत्निगिरीत गेल्या आठवड्यातही एका टँकरमधून गॅस गळतीची घटना घडली होती. टँकरमधून गॅस गळती होत असल्याचं चालकाच्या लक्षात आल्यानंतर त्याने लगेच नागरिकांकडे मदत मागितली होती. शहरातील डी-मार्टजवळ टँकर आल्यानंतर ही घटना घडली होती. यानंतर अग्निशामक दलाला (fire brigade) घटनास्थळी पाचरण करण्यात आलं होतं. अग्निशामक दलाच्या जवानांनी गॅस गळती थांबवली होती. यानंतर स्थानिकांनी सुटकेचा श्वास सोडला.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.