मुसळधार पावसामुळे मुंबईकरांना लेप्टोची बाधा; गॅस्ट्रोचे रुग्णही हजारीपार

212
मुसळधार पावसामुळे मुंबईकरांना लेप्टोची बाधा; गेस्ट्रोचे रुग्ण हजारीपार
मुसळधार पावसामुळे मुंबईकरांना लेप्टोची बाधा; गेस्ट्रोचे रुग्ण हजारीपार

जुलै महिन्यात सततच्या पावसामुळे आता मुंबईत लेप्टोचे रुग्ण वाढले आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत जुलै महिन्यात १ हजार २७४ गॅस्ट्रोचे रुग्ण आढळून आले आहेत. हिवतापाचे ४१५ रुग्ण तर,  लेप्टोच्या २४९ रुग्णांची नोंद झाली आहे.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, गॅस्ट्रो हा पोटाचा आजार आहे. दूषित पाण्याचे सेवन झाल्याने गॅस्ट्रो बळकावतो. २०१८ साली मुंबईत लेप्टो आजारामुळे अनेक जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने लेप्टो आजाराची धास्ती घेतली आहे. मच्छरांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घरात साठा केलेले पाणी सातत्याने बदलण्याचे आवाहन मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाने केले आहे.

(हेही वाचा – राज्यातील शासकीय विश्रामगृहांच्या व्यवस्थेसाठी मोबाईल ॲप तयार करणार – रविंद्र चव्हाण)

१ जुलै ते २३ जुलैपर्यंत पावसाळी आजारांची आकडेवारी – 

पावसाळी आजार रुग्णसंख्या –

  • हिवताप – ४१५
  • लेप्टो – २४९
  • डेंग्यू – ४०६
  • गॅस्ट्रो – १ हजार २७४
  • हेपेटायटीस – १११
  • चिकनगुनिया – २०
  • स्वाईन फ्लू – ६१

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.