मुंबईकर गॅस्ट्रो आणि मलेरियाने त्रस्त! पालिकेने केले काळजी घेण्याचे आवाहन

67

मुंबईत आता पावसाळी आजारांची संख्या वाढत असल्याची माहिती पालिका आरोग्य विभागाने दिली. जून महिन्याच्या सुरुवातीपासून गॅस्ट्रोचे २ हजार ८१९ तर मलेरियाचे १ हजार २०७ रुग्ण सापडले आहेत. पावसाळी आजार नियंत्रणात असल्याचा दावा करत पालिका आरोग्य विभागाने मुंबईकरांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. मुंबईकर अजूनही मुसळधार पावसाची वाट पाहत असताना २६ जूनपर्यंत २६ लेप्टोचे रुग्ण आढळल्याची माहितीही पालिका आरोग्य विभागाने दिली.

पालिकेने केले काळजी घेण्याचे आवाहन

अशुद्ध पाणी तसेच वाढत्या मच्छर, डासांचे प्रमाण पाहता पावसाळी आजारांचा विळखा मुंबईकरांना बसू लागला आहे. गॅस्ट्रो आणि मलेरिया खालोखाल हेपेटायटीस आणि डेंग्यूच्या रुग्णांची संख्या नोंदवली जात आहे. १ जूनपासून मुंबईत हेपेटायटीसचे २४६ रुग्ण तर डेंग्यूच्या ११७ केसेस समोर आल्या आहेत.

( हेही वाचा : MSRTC : एसटीचे स्मार्ट कार्ड काढण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ)

मुंबईतील ई आणि एस वॉर्डात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याची माहिती पालिका आरोग्य विभागाने मंगळवारी दिली. ई वॉर्डातील रे रोड आणि मदनपूरा भागांत तसेच एस वॉर्डातील कन्नमवार नगर आणि टागोर नगर परिसरात डेंग्यूची संख्या वाढत असल्याची माहिती पालिका आरोग्य विभागाने पावसाळी आजारांची माहिती देताना दिली. संपूर्ण महिन्यात मुंबईभरात डेंग्यूचे ११७ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ई आणि एस वॉर्डातील वाढत्या डेंग्यूच्या नेमक्या केसेसची आकडेवारी पालिका आरोग्य विभागाने दिलेली नाही. महिन्याभरात ५ रुग्णांना चिकनगुनियाची तर ४ रुग्णांना स्वाईन फ्लूची बाधा झाली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.