पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या ३ महिन्यांपासून मुंबईतील जलवाहतूक बंद होती. ही बंद असलेली सेवा अखेर १ सप्टेंबरपासून पुन्हा सुरू करण्यात आली आहे. गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा, गेट वे ते एलिफंटा सेवा पूर्ववत झाली असून पर्यटक आणि प्रवाशांसाठी ही दिलासादायक बातमी आहे.
अलिबाग-एलिफंटाला जलद मार्गाने पोहोचणे शक्य
मुंबईजवळील प्रसिद्ध पर्यटनस्थळी, अलिबागला जाण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात त्यामुळे भाऊचा धक्का ते मांडवा या रो रो सेवेला सुद्धा पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पर्यटक मोठ्या संख्येने एलिफंटा आणि अलिबागला जातात. मात्र पावसाळ्यात जलवाहतूक बंद ठेवण्यात येते. यानुसार १ जून ते ३१ ऑगस्टदरम्यान मुंबईतील प्रवासी जलवाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र १ सप्टेंबरपासून हळूहळू ही प्रवासी जलवाहतूक सुरू झाली असल्याची माहिती मुंबई सागरी मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. यामुळे आता प्रवाशांना एलिफंटा, अलिबागला जलद मार्गाने पोहोचणे प्रवाशांना शक्य होणार आहे.
( हेही वाचा : अधिकाराचा गैरवापर करणाऱ्या अधिसेविकांच्या चौकशीची मागणी; महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने राज्यभर आंदोलन व निदर्शने)
गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा (अलिबाग) तसेच गेट वे ऑफ इंडिया ते एलिफंटा अशी बोटसेवा सुरू झाली असून १ सप्टेंबरपासून सहा फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. या फेऱ्यांना प्रवाशांचा सुद्धा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
Join Our WhatsApp Community