हरिहरेश्वरच्या समुद्रकिनाऱ्यावर संशयास्पद बोट सापडल्यानंतर राज्यातील सर्व सुरक्षा यंत्रणांकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे, मुंबईत सुद्धा सध्या हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यालगत असलेले गेट वे ऑफ इंडिया पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहे. आता पुढील काही दिवस गेट वे ऑफ इंडियावर सामान्य नागरिकांना प्रवेश निषिद्ध करण्यात आला आहे.
( हेही वाचा : गणेशोत्सवात ७४ रस्ते वाहतुकीसाठी बंद; विसर्जनासाठी मार्गांमध्ये बदल)
गेट वे ऑफ इंडिया पर्यटकांसाठी बंद
मुंबई पोलिसांना एक आठवड्यापूर्वी भारताबाहेरच्या मोबाईल नंबरवरून दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देण्यात आली होती. यामुळे संपूर्ण पोलीस विभाग सध्या अलर्टवर आहे. रायगडमध्ये संशयित बोट सापडल्यानंतर राज्यात हाय अलर्ट जारी केला गेला होता. दरम्यान, यामागे कोणत्याही दहशतवाद्यांच्या हात नसल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. तसेच बोटीवरील असॉल्ट रायफल, स्फोटके आणि कागदपत्रे जप्त केल्याचेही त्यांनी सांगितले.
आता सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर गेट वे ऑफ इंडिया बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आता पुढील काही दिवस गेट वे ऑफ इंडिया पर्यटकांसाठी बंद राहणार आहे.
Join Our WhatsApp Community