- ऋजुता लुकतुके
भारतीय शेअर बाजारात सोमवारी (१६ डिसेंबर) पुन्हा एकदा पडझड दिसून आली आणि भारताचे दोनही संवेदनशील निर्देशांक लाधारण अर्ध्या टक्क्याने पडले. परदेशी बाजारांमध्ये नाताळ सुटी आणि नवीन आर्थिक वर्षाची चाहूल ही कारणं जरी असली तरी भारताशी निगडित एक महत्त्वाचं कारण आहे ते गौतम अदानी (Gautam Adani) यांच्याविरोधात तिथे झालेल्या आरोपांचं. त्यामुळे अदानी समुहाच्या सातही कंपन्यांमध्ये सोमवारी उतरती भाजणी दिसून आली.
(हेही वाचा – Noise Pollution: मुंबईत हॉर्नचा सर्वाधिक आवाज ‘या’ भागातून)
निफ्टी निर्देशांकातही १०० अंशांची घट झाली तर सेन्सेक्सही ३८४ अंशांनी कोसळला. काही दिवसांपूर्वी गौतम अदानी (Gautam Adani) आणि त्यांच्या अदानी समुहावर अमेरिकन सेक्युरिटीज् मंडळाने एक गंभीर आरोप केला होता. अदानी समुहातील ग्रीन एनर्जी कंपनीने भारत सरकारबरोबर करायच्या एका करारासाठी केंद्र सरकारमधील मंत्री आणि अधिकाऱ्यांना लाच देऊ केल्याचा आरोप अमेरिकन न्याय आणि प्रतिभूती विभागाने केला होता. या प्रकरणी अमेरिकन न्यायालयात गौतम अदानी आणि समुहातील इतर ९ संचालकांविरोधात कारवाईही सुरू करण्यात आली आहे.
आता काही जाणकारांच्या मते अदानी समुहाविरुद्ध अमेरिकन न्याय विभागाकडे सबळ पुरावे आहेत. त्यामुळे या प्रकरणी अदानी समुह अडचणीत येऊ शकतो. मात्र भारतातून अमेरिकेत हस्तांतरण होण्याची शक्यता मात्र कमी आहे. त्यामुळे अमेरिकेत त्यांच्यावर कारवाई पार पाडता येणार नाही. पण, त्यांच्यावरील खटला पूर्ण ताकदीनिशी लढवला जाईल अशी शक्यता आहे. या बातमीमुळेच भारतीय शेअर बाजारातही नैराश्य पसरलं आहे. (Gautam Adani)
(हेही वाचा – बेस्टच्या ताफ्यात लवकरच १३०० बसेस येणार; CM Devendra Fadnavis यांची विधान परिषदेत माहिती)
अदानी ग्रीन एनर्जी कंपनीकडून केंद्र सरकारने सौर ऊर्जा विकत घ्यावी आणि त्यासाठीचा दर बाजारभावापेक्षा थोडा चढाच असावा यासाठी अदानी ग्रीन कंपनीकडून भारत सरकारला २५० दशलक्ष अमेरिकन डॉलर इतकी लाच दिल्याचा आरोप अमेरिकन न्याय विभाग आणि प्रतिभूती विभागाकडून गुरुवारी करण्यात आला आहे. अदानी ग्रीन एनर्जी तसंत एझ्युर पॉवर ग्लोबल लिमिटेड या दोन कंपन्यांचा या घोटाळ्यात सहभाग असून अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानींसह (Gautam Adani) एकूण सात संचालकांवर त्यासाठी ठपका ठेवण्यात आला आहे.
अझ्युर पॉवर कंपनीचा शेअर हा अमेरिकेत न्यूयॉर्क शेअर बाजारात नोंदणीकृत आहे. आणि अदानी ग्रीन एनर्जीने गुंतवणूकदारांकडून ७५० दशलक्ष अमेरिकन डॉलर गोळा केले. तर एझ्युर कंपनीने अमेरिकन गुंतवणूकदारांकडून १५० दशलक्ष अमेरिकन डॉलर गोळा केल्याचा ठपका अमेरिकेत ठेवण्यात आला आहे. या पैशातूनच अदानी समुहाने सरकारबरोबरचा करार पूर्ण केल्याचं त्यांचं म्हणणं आहे. अदानी ग्रीन एनर्जी कंपनीने अमेरिकेतील बाँड बाजारातून रोखे विकून पैसे उभे केले आहेत. त्यामुळे तिथल्या कायद्यांनाही कंपनी बांधील आहे. सध्या अदानी समुहाने त्यांच्यावरील लाचखोरीचे सर्व आरोप फेटाळले आहेत आणि आरोपांविरुद्ध कायदेशीर मार्ग तपासून पाहणार असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. (Gautam Adani)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community