मुंबई विमानतळावरील वाहतूक आणि प्रवाशांचा ताण कमी करण्यासाठी नवी मुंबई विमानतळ बांधण्यात येत आहे. नवी मुंबई विमानतळ सुरू झाल्यानंतर मुंबईच्या आर्थिक विकासात भर पडणार आहे. वर्षभरात २ कोटी प्रवाशी क्षमतेच्या दृष्टीने येथे टर्मिनल १ चे बांधकाम जोरात सुरू आहे. त्यानंतर प्रवासी क्षमता लक्षात घेऊन बांधकाम करण्यात येणार आहे.
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेडचे सीईओ अरुण बन्सल यांनी मार्चमध्ये सांगितले होते की, येत्या काही वर्षांत मुंबई एक महत्त्वाचे राष्ट्रीय केंद्र बनेल. त्यामुळे विकासाला चालना देण्यासाठी नवी मुंबई विमानतळ वेळेत पूर्ण होणे गरजेचे आहे. गौतम अदानी यांनी स्पष्ट केले की हे नवीन विमानतळ डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण होईल.
हे विमानतळ कधी पूर्ण होणार, असा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे. या प्रश्नाचे उत्तर अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी दिले आहे. या विमानतळाची जबाबदारी अदानी समूहाकडे आहे. अदानी समूहाच्या वार्षिक सभेत नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनाची घोषणा करण्यात आली आहे. विमानतळ प्रकल्प हा महत्त्वाचा प्रकल्प असल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
(हेही वाचा – बोगस कागदपत्रांच्या आधारे सदनिका घेणाऱ्यांवर कारवाई; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती)
सुरुवातीला हा प्रकल्प GVK (जीव्हीके) समूहाकडे होता. पण, जुलै २०२१ मध्ये हा प्रकल्प अदानी समूहाकडे आला. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे मुंबई विमानतळावरील ताण कमी करण्यासाठी नवी मुंबई विमानतळ प्रस्तावित करण्यात आले होते. या विमानतळासाठी १९९९ मध्ये परवानगी देण्यात आली होती. परंतु, जुलै २०२१ मध्ये हा प्रकल्प अदानी समूहाकडे आला. अदानी समूह हा भारतातील सर्वात मोठा खाजगी विमानतळ ऑपरेटर आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळासह ७ विमानतळांचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी अदानी समूहाकडे आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community