- ऋजुता लुकतुके
अदानी समूहाची (Adani Group) मालकी असलेल्या अदानी कुटुंबाने शुक्रवारच्या एका दिवसात ४,२५१ कोटी रुपयांची कमाई केली आहे. अंबुजा सिमेंटचे शेअर्स विकून त्यांना हे पैसे मिळाले आहेत. आता हे पैसे समुहाच्या इतर कंपन्यांमध्ये गुंतवणुकीसाठी वापरले जाणार आहेत. या विक्रीद्वारे, अदानी कुटुंबाची अंबुजा सिमेंटमधील हिस्सेदारी १२५ अब्ज अमेरिकन डॉलरनी कमी झाली आहे. त्यांच्याकडून जीक्यूजी पार्टनर्स, नॅशनल पेन्शन सिस्टिम ट्रस्ट आणि एसबीआय लाईफ इन्श्युरन्स या कंपन्यांनी हे समभाग खरेदी केल्याचं समजतंय.
स्टॉक एक्स्चेंजच्या आकडेवारीनुसार, जीक्यूजी पार्टनर्सने अंबुजा सिमेंटमध्ये सर्वाधिक १,६७९ कोटी रुपयांची हिस्सेदारी खरेदी केली आहे. नॅशनल पेन्शन सिस्टम ट्रस्टने ५२५ कोटी रुपयांची हिस्सेदारी घेतली आहे. एसबीआय लाइफ इन्शुरन्सने सुमारे ५०० कोटी रुपयांची हिस्सेदारी घेतली आहे. बिझनेस स्टँडर्डच्या अहवालानुसार, अदानी कुटुंब आपल्या समूह कंपन्यांमधील भागीदारी कमी करत आहे. गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूहातील कंपन्यांचे शेअर्स सध्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर आहेत.
(हेही वाचा – BCCI Cricket Academy : बीसीसीआयची नवीन क्रिकेट अकादमी इतर खेळातील खेळाडूंसाठीही खुली)
अदानी समूहाचा अंबुजा सिमेंटमध्ये आहे इतका हिस्सा
अदानी समूह पायाभूत सुविधांवर १०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. अदानी समूहाची पुढील दशकात पायाभूत सुविधा क्षेत्रात १०० अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची योजना आहे. यातून ते या आर्थिक वर्षात १५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहेत. माहितीनुसार, अनेक गुंतवणूकदार भारताच्या विकासाच्या प्रवासात सहभागी होण्यास उत्सुक आहेत. अशा कंपन्या मोठ्या प्रमाणावर शेअर्स खरेदी करत आहेत. अशा स्थितीत अदानी कुटुंब भविष्यातही इतर कंपन्यांमधील आपली हिस्सेदारी विकणे सुरू ठेवेल, अशी अपेक्षा आहे. अंबुजा सिमेंटचा शेअर शुक्रवारी ६३३ रुपयांवर बंद झाला. या ब्लॉक डीलमध्ये कंपनीचे शेअर्स ६२५ रुपयांना देण्यात आले आहेत.
अदानी कुटुंबाचा आता अंबुजा सिमेंटमध्ये ६७.३ टक्के हिस्सा आहे. अदानी समूहाने मे २०२२ मध्ये स्विस फर्म होल्सिमकडून ही कंपनी खरेदी केली होती. आता अदानी कुटुंबही अदानी पॉवरमधील आपला हिस्सा ३ टक्क्यांनी कमी करणार आहे. मात्र, ही विक्री कधी होणार याबाबत त्यांनी अद्याप माहिती दिलेली नाही. (Gautam Adani)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community