ओडिशातील कोरोमंडल एक्स्प्रेस ट्रेन अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. सरकारने मृत आणि जखमींना मदत जाहीर केली आहे. यातच आता अदानी समुहाचे प्रमुख गौतम अदानी यांनी मोठी घोषणा केली आहे. अपघातात आई-वडील गमावलेल्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी अदानी समूह घेणार असल्याची माहिती त्यांनी ट्विटद्वारे दिली.
ओडिशा दुर्घटनेत आतापर्यंत सुमारे 288 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर 1100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. यामध्ये लहान मुले, वृद्धांसह अनेकांचा समावेश आहे. तांत्रिक चुकीमुळे कोरोमंडल ट्रेन अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. आता या अपघाताची उच्चस्तरीय चौकशी केली जात आहे. पंतप्रधानांपासून ते रेल्वे मंत्रालयापर्यंत आणि इतर राज्य सरकारे या संकटकाळात मृत आणि पीडितांच्या कुटुंबियांसोबत आहेत. पंतप्रधान मोदींनीही घटनेचा आढावा घेतल्यानंतर दोषींना सोडले जाणार नाही, असे सांगितले आहे.
उद्योगपती उद्योगपती गौतम अदानी यांनी रविवारी ट्विट केले की, ओडिशातील रेल्वे अपघातामुळे मला खूप दुःख झाले आहे. लोकांचा त्रास काही प्रमाणात कमी करण्यासाठी अदानी समूहाने अपघातात त्यांचे पालक गमावलेल्या मुलांच्या शालेय शिक्षणाची जबाबदारी उचलण्याचा निर्णय घेतला आहे. पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबियांना धीर देणे आणि मुलांचे भविष्य चांगले करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. मृतांच्या वारसांना रेल्वे मंत्रालयाकडून 10 लाखांची, गंभीर जखमींना 2 लाख तर किरकोळ जखमींना प्रत्येकी 50 हजारांची मदत जाहीर झाली. त्याशिवाय पंतप्रधान साहाय्यता निधीतून मृतांच्या वारसांना दोन लाख, तर जखमींना प्रत्येकी 50 हजारांची मदत जाहीर केली आहे. याशिवाय तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही आपापल्या राज्यातील पीडितांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याची घोषणा केली आहे.
(हेही वाचा Love Jihad : धर्मांध मुसलमानाने हिंदू असल्याचे भासवून हिंदू तरुणीवर केले अत्याचार, धर्मांतर करायला भाग पाडले )
Join Our WhatsApp Community