GDP Growth Rate : तिसऱ्या तिमाहीत भारताचा जीडीपी विकास दर ८.४ टक्क्यांवर

चौथ्या तिमाहीतही अर्थव्यवस्था ७.४ टक्क्यांनी वाढेल असा सांख्यिकी विभागाचा अंदाज आहे. 

149
IMF India Growth Forecast : भारताची अर्थव्यवस्था ७ टक्क्यांनी वाढेल असा नाणेनिधीचा सुधारित अंदाज
  • ऋजुता लुकतुके

डिसेंबर तिमाहीत देशाचं सकल देशांतर्गत उत्पादन अर्थात जीडीपी (GDP) वाढ ही ८.४ टक्के इतकी नोंदवली गेली आहे. देशातील सगळ्या अर्थतज्ज्ञांनी वर्तवलेल्या अंदाजापेक्षा प्रत्यक्ष कामगिरी खूपच चांगली आहे. अर्थ मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या सांख्यिकी विभागाने ही आकडेवारी जाहीर केली आहे. (GDP Growth Rate)

सप्टेंबर तिमाहीच्या तुलनेत डिसेंबर तिमाहीत जीडीपी विकास दरात घट होईल असा प्रमुख संस्थांचा अंदाज होता. २०२३-२४ आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचा अंदाजे विकास दर आता ८.१ असा सुधारण्यात आला आहे. तर दुसऱ्या तिमाहीत तो ८.२ असा बदलण्यात आला आहे. या अनपेक्षित वाढीमुळे २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठीचा विकासदर ७.६ असेल असा अंदाज आता सांख्यिकी विभागाने वर्तवला आहे. (GDP Growth Rate)

(हेही वाचा – Hindu Temple : कर्नाटकात हिंदू मंदिरावर ‘झिजिया’ कर लागू करण्यासाठी काँग्रेस सरकारने रचला कट)

पंतप्रधानांनी केलं जीडीपी विकासदरासाठी देशवासीयांचं अभिनंदन

मागच्या ७ तिमाहीतील हा सर्वोत्तम विकासदर आहे. यापूर्वी २०२२-२३ च्या पहिल्या तिमाहीत हा विकासदर १३.१ टक्के इतका नोंदवला गेला होता. कोव्हिड नंतर पूर्ववत होत असलेल्या अर्थव्यवस्थेचा तो पुरावा होता. आणि आधीच्या मंदीमुळे १३ टक्क्यांहून जास्त वाढ नोंदवण्यात आली. (GDP Growth Rate)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी जीडीपी विकासदरासाठी देशवासीयांचं अभिनंदन केलं आहे. ‘८.४ टक्के हा विकासदर भारतीय अर्थव्यवस्थेची क्षमता आणि ताकद अधोरेखित करतो. देशात वेगवान विकास घडवून आणून १४० कोटी भारतीयांचं जीवन समृद्ध करण्यासाठी आणि विकसित भारत घडवण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे,’ असं मोदींनी आपल्या ट्विटर पोस्टमध्ये म्हटलं आहे. (GDP Growth Rate)

(हेही वाचा – Russia-Ukraine War : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची अण्वस्त्र युद्धाची धमकी)

रिअल इस्टेट क्षेत्राची वाढ ६ टक्के

विशेष म्हणजे तिसऱ्या तिमाहीतील वाढीला उत्पादन क्षेत्राने मजबुती दिली आहे. या क्षेत्राची वाढ दोन आकडी आहे. हे क्षेत्र तिसऱ्या तिमाहीत ११.६ टक्क्यांनी वाढलं. त्या खालोखाल बांधकाम क्षेत्रातील वाढ ९.५ टक्के इतकी होती. कृषि क्षेत्रात मात्र ०.८ टक्क्यांची घट झाली आहे. पर्यटन आणि हॉटेलिंग क्षेत्रातही ६.७ टक्क्यांची वाढ झाली. रिअल इस्टेट क्षेत्राची वाढ ६ टक्के होती. (GDP Growth Rate)

जीडीपी (GDP) विकासदर वाढला असला तरी सकल मूल्यवर्धित वाढ अपेक्षेप्रमाणेच ६.५ टक्के इतकी आहे. (GDP Growth Rate)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.