संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाने (United Nations Development Programme, युएनडीपी) बुधवारी (13 मार्च) आपल्या 2023-24 या वर्षासाठीच्या मानव विकास अहवालामध्ये लैंगिक असमानता निर्देशांक 2022 जारी केला आहे. लैंगिक असमानता निर्देशांक (जीआयआय) 2022 मध्ये भारत 0.437 गुणांसह 193 देशांमध्ये 108 व्या क्रमांकावर आहे. लैंगिक असमानता निर्देशांक 2021 मध्ये भारत 0.490 गुणांसह 191 देशांमध्ये 122 व्या क्रमांकावर होता. यातून लैंगिक असमानता निर्देशांक (जीआयआय) 2021च्या तुलनेत लैंगिक असमानता निर्देशांक 2022 मध्ये 14 अंकांची लक्षणीय वृद्धी दिसून येते. (Gender Inequality Index)
(हेही वाचा – Construction Workers : शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांच्या लाभापासून बांधकाम कामगार अनभिज्ञ)
भारताची कामगिरी सातत्याने चांगली
गेल्या 10 वर्षांमध्ये, लैंगिक असमानता निर्देशांक (जीआयआय) मध्ये भारताची कामगिरी सातत्याने चांगली राहिलेली आहे, जी देशातील लैंगिक समानता साध्य करण्यासाठी प्रगतीशील सुधारणा दर्शवते. 2014 मध्ये भारताचा क्रमांक 127 वा होता, जो आता 108 वर पोहोचला आहे.
आपल्या दीर्घकालीन सामाजिक-आर्थिक आणि राजकीय विकासाच्या उद्देशाने धोरणात्मक उपक्रमांद्वारे महिलांचे सक्षमीकरण सुनिश्चित करण्यासाठी सरकारने निश्चित केलेल्या निर्णायक भूमिकेचा हा परिणाम आहे. मुलींचे शिक्षण, कौशल्य विकास, उद्योजकता सुलभीकरण आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षितता यासारख्या सरकारी उपक्रमांमुळे महिलांच्या जीवनमानात मोठ्या प्रमाणावर लाभ झालेला आहे. (Gender Inequality Index)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community