General Insurance : विमा दाव्यांच्या पूर्ततेसाठी विमा नियामक मंडळाने आणले ‘हे’ नवीन नियम

General Insurance : विमा कंपनी आणि ग्राहकांनाही काही नियम बंधनकारक असतील.

167
General Insurance : विमा दाव्यांच्या पूर्ततेसाठी विमा नियामक मंडळाने आणले 'हे' नवीन नियम
  • ऋजुता लुकतुके

वाहन, आरोग्य व गृह विम्यासारख्या साधारण विम्याचे काही नियम विमा नियामक मंडळाने (Insurance Regulatory Board) बदलले आहेत. त्यामुळे विमा पॉलिसी अधिक ग्राहकाभिमुख होईल, असा नियामक मंडळाचा दावा आहे. नवीन नियमांमुळे दाव्यांची जलद पूर्तता, काही नवीन विमा उत्पादनं तसंच विमा ग्राहकांचा हफ्ता कमी होण्यातही मदत मिळू शकेल. (General Insurance)

पहिला महत्त्वाचा बदल आहे तो विम्याच्या मुदतीत. ग्राहक आता एका वर्षापेक्षाही कमी मुदतीचा विमा निवडू शकतील. ग्राहकांची गरज लक्षात घेऊन एका वर्षापेक्षा कमी, एक वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त विम्याची मुदत ग्राहक निवडू शकतील. विमा दाव्यांच्या पूर्ततेची प्रक्रियाही आता अधिक सुटसुटीत करण्यात आली आहे. शिवाय ही प्रक्रिया सुसुत्रितही झाली आहे. (General Insurance)

(हेही वाचा – Ayodhya: राम मंदिराची सुरक्षा व्यवस्था कडक करण्याची तयारी सुरू, दहशतवादाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारची योजना काय ? वाचा सविस्तर…)

…तर होऊ शकते दंडात्मक कारवाई

विम्याचा दावा केल्यावर सर्व्हेअर तुमच्या दाव्यावरील अहवाल सादर करतो आणि तो आल्यावरच विम्याविषयीचा निर्णय होतो. आता ऑनलाईन पद्धतीने विमा परिषद तुमच्या दाव्यासाठी सर्व्हेअरची नेमणूक करेल. ही नेमणूक २४ तासांच्या आत होणं बंधनकारक असेल आणि सर्व्हेअरने आपला अहवाल १५ दिवसांत देणंही बंधनकारक असेल. त्यामुळे पूर्तताही जलद होऊ शकेल. विमा कंपनीला हा अहवाल मिळाला की, सात दिवसांच्या आत त्यांना विम्याची पूर्तता करावी लागेल. (General Insurance)

आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे कागदपत्रांच्या अभावामुळे विमा (Insurance) दावा इथून पुढे कंपनीला नाकारता येणार नाही. अंडररायटिंगच्या वेळी ग्राहकांकडून सगळी कागदपत्रं घेणं गरजेचं आहे. त्यामुळे अंडररायटिंग झाल्यावर कागदपत्रांचं कारण विमा कंपनीला देता येणार नाही. वर दिलेल्या मुदतीचा भंग झाल्यास विमा कंपनी त्यासाठी जबाबदार धरण्यात येईल आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते. तो अधिकार विमा नियामक मंडळाकडे असेल. खासकरून वाहन विम्याच्या बाबतीत ग्राहकांना आता अधिक सुटसुटीत पर्याय उपलब्ध असतील. ‘पे ॲज यु गो,’ ‘पे ॲज यु ड्राईव्ह’ आणि ‘पे ॲज यु युज’ असे विमा हफ्त्याचे तीन पर्याय ग्राहकांकडे उपलब्ध असतील. (General Insurance)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.