कोरोनानंतर आता रेल्वे पुन्हा पुर्वपदावर आली आहे. मात्र रेल्वेतील बेडरोल, जनरल बोगी बंदच होत्या. आता एकेक सुविधा सुरु झाल्या असून, येत्या 29 जूनपासून मध्य रेल्वेच्या 165 गाड्यांमध्ये जनरल तिकिटांची सुविधा सुरु होणार आहे. मेल आणि एक्सप्रेस रेल्वेमध्ये जनरल तिकीट घेऊन प्रवाशांना प्रवास करता येणार आहे.
तब्बल दोन वर्षांच्या काळानंतर आता प्रवाशांना जनरल तिकिटावर प्रवास करता येणार आहे. कोरोना काळानंतर, रेल्वेने देशातील विविध मार्गांवर काही स्पेशल ट्रेन सुरु केल्या. मध्य रेल्वेच्या 165 गाड्यांमध्ये दिली जाणार सुविधा, येत्या 29 जूनपासून सुरुवात याची सुरुवात होणार आहे.
( हेही वाचा: शिक्षण मंत्रालय, अग्निवीरांचे सेवा प्रशिक्षण पदवी अभ्यासक्रमांसाठी ग्राह्य धरणार )
Join Our WhatsApp Community