हायड्रोजनवर चालणाऱ्या रेल्वेचे जाळे उभारणारा हा ठरला जगातील पहिला देश!

202

पर्यावरण संरक्षणासाठी हायड्रोजनवर चालणाऱ्या रेल्वेचे जाळे उभारणारा जर्मनी हा जगातील पहिला देश ठरला आहे. जर्मनीतील लोअर सॅस्कोनी राज्यामध्ये हायड्रोजन रेल्वे यंत्रणा सुरू झाली आहे. फ्रान्सच्या अल्सटम कंपनीने हायड्रोजनवर चालणाऱ्या ट्रेन बनविल्या असून त्या जर्मनीत चालविल्या जात आहेत. सध्या हायड्रोजनवर चालणाऱ्या पाच ट्रेन जर्मनीत असून वर्षाखेरिस याची संख्या चौदापर्यंत जाणार आहे.

( हेही वाचा : खासगी बसप्रवास महागला; गणेशोत्सवातील कोकणवारी खिशाला भारी )

हायड्रोजनवर चालणाऱ्या रेल्वेचे जाळे उभारणारा पहिला देश 

या हायड्रोजनरेल्वेद्वारे प्रवासी प्रदूषण विरहित प्रवास करू शकतात तसेच यातून ध्वनिप्रदूषण सुद्धा कमी होणार आहे. हायड्रोजनवर चालणाऱ्या रेल्वेमुळे कार्बनडाय ऑक्साइड उत्सर्जनात ४४०० टनांनी घट होणार आहे. या ट्रेनचा कमाल वेग ताशी १४० किमी आहे तसेच या ट्रेनमुळे दरवर्षी १०.६ लाख लिटर डिझेलची बचत होणार आहे. हायड्रोजन इंधन रेल्वेमुळे जर्मनीच्या अर्थव्यवस्थेलाही फायदा होणार आहे. हरित वायूंच्या उत्सर्जनात २०३० पर्यंत ६५ टक्के कपात करण्याचे उद्दिष्ट जर्मनीने राखले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.