क्षणात हवय लसीकरणाचे प्रमाणपत्र, तर सेव्ह करा ‘हा’ मोबाईल क्रमांक

116

देशात आतापर्यंत ओमिक्रॉन या कोरोनाच्या नवीन विषाणू प्रकाराचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही, मात्र या साथीच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या विध्वंसातून धडा घेत सरकारने याला रोखण्यासाठी विविध पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मात्र, यामुळे नागरिकांनाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

ओमिक्रॉनचा संसर्ग टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून सरकार आणि प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांमध्ये, तसेच अनेक ठिकाणी प्रवेश करण्यासाठी RT-PCR चाचण्यांच्या नकारात्मक अहवालांसह, कोरोना विषाणूच्या लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या प्रमाणपत्राचा समावेश आहे. ही प्रमाणपत्रे वेळेत उपलब्ध होण्यासाठी केंद्र सरकारकडून अनोखी योजना राबवली जाणार आहे. यामुळे तुम्हीही तुमच्या मोबाईलवर कुठेही, केव्हाही प्रमाणपत्र मिळवू शकता.

प्रवासादरम्यान प्रमाणपत्र महत्त्वाचे 

आता प्रवासादरम्यान आणि इतर अनेक ठिकाणी लसीकरणाचे प्रमाणपत्र आवश्यक झाले आहे. यासाठी सरकारने अतिशय सोपे आणि सोयीचे तंत्रज्ञान सुरू केले आहे. ज्या व्यक्तीने कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. अशा लोकांना या नव्या तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन प्रमाणपत्र मिळवता येणार आहे.

( हेही वाचा : लसवंत असाल तरच आता रिक्षा-टॅक्सीत मिळणार एन्ट्री! )

काही मिनिटात असे मिळवा प्रमाणपत्र

कोरोना लसीकरणाचे प्रमाणपत्र एका मिनिटात मिळविण्यासाठी, तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये 9013151515 हा क्रमांक सेव्ह करा आणि व्हॉट्सअॅपवर प्रमाणपत्र असे टाइप करा. लसीकरण प्रमाणपत्र त्वरित उपलब्ध होईल. केंद्र सरकारच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे. यावर काँग्रेस खासदार शशी थरूर यांनीही मोदी सरकारचे कौतुक केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.