सध्या देशात कोरोना संसर्ग आटोक्यात असल्याने सरकारने अनेक निर्बंध शिथिल केले आहेत. मात्र इतर देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने आता भारत सरकारने सावध पावले उचलली आहेत. 10 एप्रिलपासून 18 वर्षांवरील सर्वच नागरिकांना बूस्टर डोस दिले जाणार आहेत. आतापर्यंत देशातील 194 कोटी नागरिकांचे लसीकरण झाल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले आहे.
( हेही वाचा : अरे बापरे! पुन्हा मुंबईत कोरोनाचा नवा विषाणू, जाणून घ्या खरी माहिती… )
बूस्टर डोस कधी घेता येणार? यासाठी कोणते नियम पाळावे लागतील? बूस्टर डोससाठी कोणती लस दिली जाईल? ही लस घेण्यासाठी अपॉइंटमेंट कशी बुक करायची? याविषयी सविस्त माहिती खालीलप्रमाणे आहे.
तुम्ही बूस्टर डोस केव्हा घेऊ शकता?
18 वर्षांवरील सर्वच नागरिकांना बूस्टर डोस दिले जाणार आहेत. फक्त यासाठी लसीचा दुसरा डोस घेऊन 9 महिने किंवा 39 आठवड्यांचा कालावधी पूर्ण झालेला असावा.
मोफत बूस्टर डोस
आता दिले जाणारे बूस्टर डोस हे आरोग्य सेवा कर्मचारी आणि 60 वर्षांवरील नागरिकांसाठी सरकारी लसीकरण केंद्रांवर मोफत सुरु राहणार आहेत. त्याला गती दिली जाणार असल्याचे, आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.
कोणती लस घेणार ?
पहिला व दुसरा डोस ज्या कंपनीचा घेतला असेल त्याच कंपनीचा तिसरा डोस अर्थात बूस्टर डोस देण्यात येणार आहे. उदा. संबंधित व्यक्तीने कोविशिल्ड लसीचे दोन डोस घेतले असल्यास त्या व्यक्तीला बूस्टर डोस सुद्धा कोविशिल्डचाच दिला जाईल.
नोंदणी कशी कराल ?
बूस्टर डोस घेण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्थात कोविन पोर्टलवरून आणि प्रत्यक्ष केंद्रावर जाऊन देखील अपॉइंटमेंट बुक करता येऊ शकेल.
बूस्टर डोसचे प्रमाणपत्र मिळणार का?
लसीकरण पूर्ण झाल्यावर कोविन अॅप किंवा आरोग्यसेतूवरून प्रमाणपत्र डाऊनलोड करू शकता.
खासगी केंद्रांवरही उपलब्ध
एखाद्याला बूस्टर डोस घ्यायचा असेल, तर खासगी हॉस्पिटलमध्येही ही सुविधा उपलब्ध होणार आहे. आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, ज्यांचे वय 18 वर्षांहून अधिक आहे आणि दोन्ही डोस घेतले असून, दुसऱ्या डोसला ९ महिन्यांहून अधिक कालावधी झाला आहे, ते कोरोनाचा प्रतिबंधात्मक डोस घेऊ शकतात. खासगी केंद्रांवरही ही सुविधा उपलब्ध होणार आहे.
Join Our WhatsApp Community