रेशन कार्ड आधारला लिंक करून मिळवा ‘हे’ फायदे

154

रेशन कार्डमुळे लाभार्त्यांना कमी दरात धान्य मिळते. केंद्र सरकारने ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ योजना सुरू केली आहे. याअंतर्गत देशातील लाखो लोकांना लाभ मिळत आहे. या ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ म्हणजेच रेशन कार्डला आधार लिंक केल्यामुळे देशातील कोणत्याही राज्यातील रेशन कार्ड दुकानातून तुम्ही रेशन मिळवू शकता. केंद्र सरकारने यासंदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे, रेशन कार्ड आधारला लिंक करण्याच्या शेवटच्या तारखेत सरकारने वाढ केली असून आता लाभार्थी ३० जून २०२२ पर्यंत त्यांचे रेशन कार्ड आधारशी लिंक करू शकणार आहेत. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने याबाबत अधिसूचना जारी करून ही माहिती दिली आहे.

( हेही वाचा : मोबाईल डेटा लवकर संपतोय? तर करा हे उपाय )

असे करा रेशन कार्ड आधारला लिंक

  • uidai.gov.in या अधिकृत वेबसाइटवर क्लिक करा
  • या वेबसाइटवर क्लिक केल्यावर start now हा पर्याय निवडा
  • तुमचा घरचा पत्ता भरा
  • Ration card benefit या पर्यायाची निवड करा
  • या पर्यायामध्ये तुमचा आधार कार्ड क्रमांक, रेशन कार्ड क्रमांक, ई-मेल पत्ता, मोबाईल क्रमांक समाविष्ट करा
  • यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल
  • याठिकाणी ओटीपी भरल्यावर तुम्हाला तुमची लिंक प्रक्रिया पूर्ण झाल्याचा मेसेज येईल
  • ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुमचे रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक होईल.
  • तुम्ही ऑफलाईन प्रक्रिया करून सुद्धा रेशन कार्ड आधारशी लिंक करू शकता याकरता जवळच्या रेशनकार्ड केंद्राशी संपर्क साधा.

रेशन कार्डला आधार लिंक केल्यामुळे देशातील कोणत्याही राज्यातील रेशन कार्ड दुकानातून तुम्ही रेशन मिळवू शकता. त्यामुळे लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करा असे आवाहन सरकारने रेशन कार्ड लाभार्त्यांना केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.