ghar wapsi : मध्य प्रदेशात मुस्लिम कुटुंबातील १८ जणांनी स्वीकारला हिंदू धर्म

सध्या देशात मुस्लिम समाज हिंदू धर्म स्वीकारून घरवापसी करत असल्याच्या घटना घडत आहेत. विशेषतः मध्य प्रदेशात या घटना अधिक घडत आहेत. मागील 15 दिवसांत मुस्लीम धर्मातून हिंदू बनल्याचे दुसरे मोठे प्रकरण समोर आले आहे. यावेळी रतलामच्या आम्बा येथील एकाच कुटुंबातील 18 जणांनी हिंदू धर्म स्वीकारला आहे. कुटुंबातील प्रमुख असलेले मोहम्मद शाह आता राम सिंह बनले आहेत. येथील भीमनाथ मंदिरात महाशिवपुराणच्या पूर्णाहुतीनंतर स्वामी आनंदगिरी महाराज यांच्या सानिध्यात सर्वांनी हिंदू धर्म स्विकारला.

शेण, गोमुत्राने अंघोळ केली 

याप्रसंगी या मुस्लिम कुटुंबाला शेण आणि गोमुत्राने अंघोळ घालण्यात आली आणि सर्वांनी जानवे धारण केले. धर्मांतरणापूर्वी सर्वांनी शपथपत्र तयार केले होते. त्यामध्ये आपण कुठल्याही दबावाला बळी न पडता धर्मांतर करत असल्याचे त्यांनी म्हटले. या कुटुंबाच्या प्रमुखांनी स्वामी आनंदगिरी यांच्याकडे जाऊन धर्मांतर करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. दरम्यान 13 दिवसांपूर्वी मंदसौरमध्ये शेख जफर शेख, वडिल गुलाम मोइनुद्दीन शेख यांनी हिंदू धर्म स्विकारला आहे. आता ते चेतनसिंह राजपूतच्या नावाने ओळखले जातात. त्यांची पत्नी अगोदर हिंदू धर्मीय होती. शेख जफरने भगवान पशुपतिनाथ मंदिराच्या प्रांगणात धर्मांतर केले.

गावोगावी फिरून आयुर्वेदाचा प्रसार करणार 

आता गावगोवी फिरुन आयुर्वैदीक आणि तावीज विकणाऱ्या 55 वर्षीय मोहम्मद शाह यांनी कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईकांसमवेत धर्मांतर केले आहे. स्वामी आनंदगिरी महाराज यांनी धर्मांतराला मान्यता दिल्यानंतर, न्यायालयातून शपथपत्र बनवून घेण्याचे मोहम्मद यांना सूचवले होते. दोन-तीन पिढ्यांपूर्वी त्यांचे पूर्वज हे बोदी समाजाचे असून पुंगी वाजविण्याचे काम करत होते. त्यानंतर रोजगाराच्या शोधात आयुर्वैदीक औषधे आणि ताविज बनवून विकण्यासाठी इतरत्र भटकत राहिले. त्यातूनच त्यांनी मुस्लीम धर्म स्विकारल्याचे मोहम्मद शहा यांनी यावेळी म्हटले. तसेच आता पुन्हा हिंदू धर्मात आल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here