Ghar Wapsi : केरळमध्ये ९२ ख्रिस्त्यांची घरवापसी; ३०० कुटुंबे शुद्धीकरणाच्या प्रतीक्षेत

206
Ghar Wapsi : केरळमध्ये ९२ ख्रिस्त्यांची घरवापसी; ३०० कुटुंबे शुद्धीकरणाच्या प्रतीक्षेत
Ghar Wapsi : केरळमध्ये ९२ ख्रिस्त्यांची घरवापसी; ३०० कुटुंबे शुद्धीकरणाच्या प्रतीक्षेत

केरळमध्ये (Kerala) हिंदूंची मोठ्या प्रमाणात धर्मांतरे होत आहेत. त्या वेळी आमीषाला बळी पडून धर्मांतर केलेले हिंदू आता पुन्हा हिंदु धर्मात (Hindu Dharma) प्रवेश करत आहेत. केरळमधील इडुक्की (Idukki) आणि अलप्पुळातील (Alappuzha) ९२ व्यक्तींनी नुकतेच सनातन धर्मात पुनर्प्रवेश केला आहे. (Ghar Wapsi)

इडुक्कीमधील ३७ कुटुंबांमधील ६५ धर्मांतरितांनी इलाप्पारा येथील मंदिरात पूजा करून सनातन धर्मात घरवापसी केली. अलप्पुळातील कायमकुलम येथील पाच ख्रिस्तीही घरी परतले आहेत. हिंदू संघटनेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरात अशी ३०० कुटुंबे आहेत, जी ख्रिश्चन आहेत आणि ते सर्व सनातन धर्मात परतण्याची वाट पहात आहेत.

(हेही वाचा – Mahasanskrit Mahotsav 2024 : देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यभर विविध सांस्कृतिक कार्यक्रम, ‘बौद्ध’ आणि ‘शबरी’ महोत्सवाचे शनिवारी आयोजन)

सनातन धर्मात (Sanatan Dharma) घरी परतलेले सर्व लोक चेट्टीकुलंगरा, कन्नमंगलम आणि कायमकुलम येथील आहेत, असे स्थानिक हिंदू संघटनेच्या जिल्हाध्यक्षांनी सांगितले. ते म्हणाले की, हे सर्व लोक सनातन धर्माशी संबंधित कार्यक्रम ऐकण्यासाठी आले होते. यानंतर त्यांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश करण्याचा निश्चय झाल्याने त्यांनी आमच्या लोकांशी संपर्क साधला आणि त्यांची इच्छा व्यक्त केली. यानंतर आम्ही पुजारी आणि सर्व गोष्टींची व्यवस्था केली. प्रत्येक जण स्वेच्छेने धर्मात परतला आहे. भविष्यातही असे कार्यक्रम सुरूच रहातील.

इडुक्की येथील इलाप्पारा येथील कीझपेरुंथारा मंदिर मैदानावर घरवापसी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या सर्वांना भेट म्हणून गीतेची प्रत देण्यात आली आहे. पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) व्ही.एन. साजी म्हणाले, “प्राथमिक अहवालांनुसार, कोणालाही शुद्धीकरणासाठी भाग पाडले गेले नाही. घरवापसी कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी मंचावरून जाहीर करण्यात आले होते की, जे लोक धर्मांतरासाठी मंदिरात आले आहेत, ते त्यांचा निर्णय बदलण्यास आणि त्यांच्या सध्याच्या धर्मात राहण्यास पूर्णपणे स्वतंत्र आहेत.” (Ghar Wapsi)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.