राम नवमीच्या दिवशी पंढरपुरात झाले शुद्धीकरण; वाट चुकलेल्या तरुणाची झाली घरवापसी

139

पंढरपूरात हिंदुमहासभा भवनात राम नवमीच्या दिवशी एक शुध्दीकरण समारंभ झाला. प्रकाश देवकाते या वाट चुकलेल्या युवकाने पुन्हा हिंदू धर्मात स्वगृही येण्याची कळकळीची इच्छा व्यक्त केली. मूळ राशिन करमाळा भागातील हा युवक हडपसर पुण्यात असतो.

Hindu1

चुकीचे प्रायश्चित घेवून त्याचे रामनवमीच्या शुभमुहुर्तावर शुध्दीकरण करण्यात आले. विशेष बाब म्हणून पौरोहित्य सुप्रसिध्द वकील आषुतोष बडवे यांनी केले. आयुष्यभरात शंभराहून अधिक शुध्दीकार्ये केलेले हिंदुमहासभेचे ज्येष्ठ कार्यकर्ते शेलारमामा ८१व्या वर्षात असूनही जातीने आशिर्वाद देण्यास उपस्थित होते. वारकरी पाइक संघाचे राष्ट्रीय प्रवक्ते ह.भ.प. रामकृष्ण वीर महाराज यांनी स्वागत करुन आशिर्वाद दिले. यावेळी हिंदुमहासभेचे शहराध्यक्ष बाळासो डिंगरे, प्रशांत खंडागळे , दिपक कुलकर्णी, पंडितभोले पुणेकर, गणेशजी, डाॕ. आक्षय देशपांडे , आदी मान्यवरांनी शुध्दीकृतास शुभेच्छा दिल्या. त्यानंतर रामनवमीचे औचित्य साधून सर्व जणांनी आहिल्यामाता होळकर स्थापित श्रीराम मंदिरात दर्शन घेतले. होळकर वाड्याचे व्यवस्थापक आदित्य फत्तेपूरकर यांनी शुध्दिकृतास शुभेच्छा व रामाचे आशिर्वाद दिले.

हिंदुमहासभा भवनात असे कार्यक्रम वारंवार घडतात. छळ, बळ, प्रलोभन, चूक यातून परधर्मात गेलेल्यांना पुन्हा हिंदू धर्मात आणण्यासाठी गेले शंभर वर्षाहून अधिक काळ हिंदुमहासभा प्रयत्नशील आहे. जनतेने संपर्क व सहकार्य करावे असे आवाहन हिंदुमहासभेचे राष्ट्रीय नेते अभयसिंह इचगांवकर यांनी केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.