कुर्ल्यातील बेस्ट ई-बस अपघाताची घटना ताजी असतानाच घाटकोपरच्या मच्छी मार्केट रोडवर भरधाव टेम्पो सहा जणांना धडक दिल्याची घटना दि. २७ डिसेंबर रोजी सायंकाळी घडली. अपघातात प्रीती रितेश पटेल (Preeti Ritesh Patel) (३५) या महिलेचा मृत्यू झाला असून अन्य पाच जखमींवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करुन घाटकोपर पोलिसांनी चालक उत्तम बबन खरात (२५) याला अटक केली आहे. (Ghatkopar Accident)
( हेही वाचा : World Rapid & Blitz Chess World Cup : जलदगती बुद्धिबळाच्या विश्वचषकात जगज्जेता डी गुकेश का खेळत नाही?)
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. २७ डिसेंबर रोजी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास घाटकोपर (Ghatkopar) पश्चिमेकडील, चिराग नगर येथील मच्छी मार्केट रोडवर ही अपघाती घटना घडली. यातील आरोपी चालक खरात हा शीत पेय्याने भरलेला टाटा कंपनीचा छोटा टेम्पो घेऊन मार्केट रोडवरुन जात होता. त्याचा वाहनावरील ताबा सुटला. टेम्पोने सहा पादचाऱ्यांना धडक दिली. पुढे, भिंतीला धडकून टेम्पो थांबला.(Ghatkopar Accident)
अपघाती घटनेने मच्छी मार्केटमध्ये एकच खळबळ उडाली. स्थानिकांनी अपघाताची माहिती पोलिसांना देत चालक खरात याला ताब्यात घेऊन चोप दिला. घटनेची माहिती मिळताच घाटकोपर (Ghatkopar) पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने उपचारांसाठी राजावाडी रुग्णालयात नेले. पण, डॉक्टरांनी प्रीती पटेल यांना मृत घोषित केले. त्या येथील पारशीवाडीतील भागीरथी चाळीत रहात होत्या.(Ghatkopar Accident)
अपघातात रेश्मा शेख (२३), अरबाज शेख (२३) मारूफा शेख (२२), तौफा उजहर शेख (३८) आणि मोहरम अली अब्दूल रहीम शेख (२८) जखमी झाले असून त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
फिट आली की, ड्रिंक अँड ड्राईव्ह ?
घाटकोपर मच्छी मार्केट रोडवरील अपघाताप्रकरणी पोलिसांनी चालक खरात याला ताब्यात घेत चौकशी सुरु केली आहे. चालक खरात हा दारूच्या नशेत असल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. तर, अचानक डोळ्या समोर अंधारी येऊन फिट आल्याने वाहनावरील नियंत्रण सुटल्याचा दावा खरात याने केला आहे. अटक आरोपी चालक खरात याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. तो नशेत होता की त्याला फिट आली हे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट होईल असेही पोलिसांनी सांगितले.(Ghatkopar Accident)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community