घाटकोपर उच्चस्तर जलाशयास पाणीपुरवठा करणारी ७२” व्यासाची जलवाहिनी चांदिवली ब्रिजजवळ अचानक फुटल्यामुळे घाटकोपर उच्चस्तरीय जलाशयातून होणारा पाणीपुरवठा जलवाहिनी दुरुस्त होईपर्यंत बंद राहील. तसेच सदर गळती दुरुस्तीचे काम युदधपातळीवर सुरू असून, एन विभागातील खालील विभागात पाणी पुरवठा बंद राहील.
घाटकोपर च्या असल्फा विभागात ७२” इंचाची जलवाहिनी फुटल्याने रस्त्याला नदीचे स्वरूप आले. इतका प्रचंड पाण्याचा फवारा आणि प्रवाह आहे की यात अनेक दुचाकी, आजू बाजूच्या घरांचे, दुकानांचे साहित्य वाहून गेले आहे. असल्फा पाईप लाईन विभागात ब्रिटिशकालीन ७२ इंचाची जलवाहिनी आहे. ही अतिशय जीर्ण झालेली जलवाहिनी फुटल्याच्या वारंवार घटना याआधीही घडल्या आहेत. याआधी देखील ही जलवाहिनी फुटून अक्षरशः घरे कोसळली होती. आता देखील ही जलवाहिनी फुटल्याने मोठे नुकसान झाले आहे.
( हेही वाचा: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक! पहा संपूर्ण वेळापत्रक )
एन विभागातील ‘या’ भागांत पाणी पुरवठा बंद
घाटकोपर उच्चस्तर जलाशय – राम नगर, हनुमान नगर, राहुल नगर, कैलास नगर, संजय गांधी नगर, शंकर मंदीर, जय मल्हार नगर, शिवाजी नगर, आंबेडकर नगर, निरंकारी सोसायटी, वर्षा नगर, ए व बी कॉलनीचा काही परिसर, डी व सी म्युनिसिपल कॉलनी, रायगड विभाग, आनंदगड, यशवंत नगर, गावदेवी, पठाण चाळ, अमृत नगर, इंदिरा नगर १ व २, अमिनाबाई चाळ, गणेश मैदान, मौलाना कंपाऊंड, हरिपाडा, जगदुषा नगर, कठोडीपाडा, भीमानगर, अल्ताफनगर, गेल्डानगर, गोळीबार मार्ग, नवीन दयासागर, जवाहरभाई प्लॉट, सेवानगर, ओ. एन. जी. सी. कॉलनी, माझगाव डॉक कॉलनी, गंगावाडी गेट नंबर २, सिद्धार्थ नगर, आंबेडकर नगर, साईनाथ नगर, पाटीदार वाडी, रामाजी नगर, भटवाडी, बर्वेनगर, काजू टेकडी, अकबरलाला कंपाऊंड, आझादनगर, पारसी वाडी, सोनिया गांधी नगर, खाडी मशीन, गंगावाडीचा काही परिसर. संबंधीत परिसरातील नागरिकांना महापालिकेने पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.
Join Our WhatsApp Community