घाटकोपर Green Waste Project बंद, आगीच्या दुर्घटनेनंतर पुन्हा प्रकल्प सुरु होईना

527
घाटकोपर Green Waste Project बंद, आगीच्या दुर्घटनेनंतर पुन्हा प्रकल्प सुरु होईना
  • सचिन धानजी, मुंबई

पूर्व उपनगरातील हरित कचऱ्यावर (Green Waste Project) प्रक्रिया करण्यासाठी सुरु केलेला प्रकल्प अखेर महापालिका प्रशासनाने बासनात गुंडाळला आहे. घाटाकोपर येथील या प्रकल्पात पूर्व उपनगरे परिसरातील हरित कचऱ्याची शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावली जात होती. परंतु या प्रकल्पातील सर्व मशिनरी जळून खाक झाल्यानंतर पुन्हा हा प्रकल्प सुरुच करण्यात आला नाही. या प्रकल्पांतर्गत मान्सूनपूर्वी कापण्यात आलेल्या झाडांच्या फांद्यांच्या कचऱ्यापासून पॅलेटस तयार केले जात होते. परंतु हा प्रकल्पच मागील दोन वर्षांपासून बंद असल्याने हरित कचऱ्यावरील प्रक्रियाच थांबली गेली आहे.

पूर्व उपनगरे परिसरातील हरित कचऱ्याची (Green Waste Project) शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी घाटकोपर येथील ४ हजार चौरस मीटरच्या जागेत प्रकल्प सन २०१६ मध्ये सुरु करण्यात आला होता. घाटकोपर (पश्चिम) येथे हरित कचऱ्यापासून `पॅलेट्स’ व `बिक्रेट्स’ निर्मिती व दैनिक १६ टन क्षमतेचा प्रकल्प करण्याचा प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. सध्या या प्रकल्पामध्ये दररोज सुमारे १६ टन कचऱ्यावर प्रक्रिया करुन त्यापासुन सुमारे ८ ते १० टन इतक्या प्रमाणात `पॅलेट्स’ व `बिक्रेट्स’ ची निर्मिती करण्यात येत होती.

(हेही वाचा – Assembly Elections : वंचितला ‘गॅस सिलेंडर’ तर प्रहारला ‘बॅट’)

मुंबई महानगरपालिकेने चाणक्य इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक लिडरशिप (सीपीएल) या संस्थेशी समन्वय साधून घाटकोपर (पश्चिम) मध्य रेल्वे मार्गाजवळील बाजूस १००० चौरस मीटर क्षेत्रफळाची जागा उपलब्ध करुन दिली. या जागेवर पूर्वी अतिक्रमण व समाज कंटकांची मोठी समस्या होती. या जागेचे व्यवस्थापन करणे महापालिका प्रशासनाला गरजेचे वाटत होते. या अनुषंगाने चाणक्य इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक लिडरशिप संस्थेच्या मदतीने या जागेचे व्यवस्थापन करणे पालिकेला शक्य झाले.

हरित कचरा (ग्रीन वेस्ट) गोळा करुन त्याचे परिमंडळनिहाय अशा स्वरुपाचे पॅलेट्स आणि ब्रिकेटर्स उत्पादन करावे, हे महापालिका प्रशासनाच्या विचाराधीन होते. त्यानुसार चाणक्य इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक लिडरशिप या संस्थेला ही जागा केवळ पाच वर्षांच्या मुदतीवर घाटकोपर (पश्चिम) येथे उपलब्ध करुन देण्यात आली होती. पण त्याच जागेवर झाडांचा पाला-पाचोळा, फांद्या यासारख्या सुमारे १६ टन इतक् हरित कच-यापासून पॅलेट्स व बिक्रेट्स तयार करण्यात येत होते.

(हेही वाचा – Assembly Elections : मतदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी राजकीय पक्षांचेही सहकार्य अपेक्षित)

परंतु या प्रकल्पांतील पालापाचोळा आणि मशिनरीज यांना सन मार्च २०२२मध्ये आग लागल्याने त्या जळून खाक झाले. परंतु तेव्हापासून हा प्रकल्प (Green Waste Project) बंद झाल्यानंतर अद्यापही याची सुरुवात झालेली नाही, हा प्रकल्प बंद असला तरी पुन्हा प्रकल्प सुरु चालू करण्यासाठी अनेक संस्थाकडे विचारणा करण्यात आली होती, परंतु हा प्रकल्प चालू करण्यासाठी मोठा खर्च येणार असल्यामुळे कोणतीही संस्था प्रकल्प चालू करण्यास तयार झालेली नाही, त्यामुळे हा प्रकल्प सुरु करण्यात आला नसल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

ब्रिक्रेट्सचा वापर काय?

‘स्वच्छ मुंबई-स्वच्छ भारत’ मोहिमेअंतर्गत महापालिकेद्वारे राबविण्यात येत असलेल्या अनेक नाविन्यपूर्ण व प्रयोगशिल उपक्रमांमध्ये एक महत्त्वाचा संयुक्त उपक्रम म्हणजे महापालिका क्षेत्रातून जमा होणाऱ्या हरित कचऱ्यापासून `पॅलेट्स’ व `बिक्रेट्स’ ची निर्मिती करण्याचा प्रकल्प होय! दंडगोलाकृती असणारे `ग्रीन पॅलेट्स’ व छोट्या विटेसारखे दिसणारे `बिक्रेट्स’ हे एक प्रभावी व ज्वलनशील इंधन आहे. (Green Waste Project)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.