Ghatkopar Hoarding Accident : नफ्याच्या लालसेपोटी १७ जणांचा बळी, इगो कंपनीच्या माजी संचालिकेच्या पत्रव्यवहारातून आले समोर

135
Ghatkopar Hoarding Accident : नफ्याच्या लालसेपोटी १७ जणांचा बळी, इगो कंपनीच्या माजी संचालिकेच्या पत्रव्यवहारातून आले समोर

‘इगो मीडिया प्रा. लिमिटेड’ या कंपनीला होर्डिंग उभारण्यासाठी मंजुरी मिळावी यासाठी कंपनीच्या तत्कालीन संचालिका जान्हवी मराठे हिने रेल्वे पोलिस विभागाला जास्त नफ्याचे आमिष देऊन घाटकोपर येथील दुर्घटनाग्रस्त होर्डिंगची निविदा मंजूर केल्याचे पत्रव्यवहारातून समोर आले आहे. जान्हवी मराठेने रेल्वे पोलीस विभागाला केलेल्या पत्रव्यवहाराची प्रत विशेष तपास पथकाच्या हाती लागली आहे. (Ghatkopar Hoarding Accident)

घाटकोपर होर्डिंग दुर्घटना (Ghatkopar Hoarding Accident) प्रकरणाचा तपास करणाऱ्या गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने होर्डिंग दुर्घटने प्रकरणी इगो मीडिया कंपनीच्या माजी संचालिका जान्हवी मराठे आणि सिव्हिल इंजिनियर सागर कुंभार यांना शनिवारी गोव्यातील एका हॉटेल मधून ताब्यात घेत मुंबईत आणून त्यांना अटक करण्यात आली. या गुन्ह्यातील ही चौथी अटक असून यापूर्वी इगो मीडियाचा मालक भावेश भिंडे आणि स्ट्रक्चर ऑडिटर मनोज संघु यांना अटक करण्यात आली होती. (Ghatkopar Hoarding Accident)

(हेही वाचा – Versova Unauthorised Construction : वेसावे शिव गल्लीतील आणखी एक अनधिकृत इमारतीचे बांधकाम जमीनदोस्त)

काय लिहिले होते पत्रव्यवहारात?

घाटकोपर पूर्व येथील रेल्वे पोलीस विभागाच्या जागेवर उभारण्यात आलेल्या महाकाय बेकायदेशीर होर्डिंग १३ मे रोजी कोसळून झालेल्या दुर्घटनेत १७ जणांचा बळी गेला आणि ८० जण जखमी झाले होते. हे दुर्घटनाग्रस्त होर्डिंग इगो मीडिया कंपनीने उभारले होते, हे होर्डिंग उभारण्यात आले त्या वेळी इगो कंपनीच्या संचालकपदी जान्हवी मराठे होत्या. घाटकोपर येथे रेल्वे पोलिस विभागाच्या जागेवर होर्डिंग उभारण्यासाठी इगो आणि क्युकॉम या दोन कंपन्यांनी निविदा दिली होती. या ठिकाणी होर्डिंग उभारण्याचे काम क्युकॉम कंपनीला मिळत असल्याचे बघून जान्हवी मराठे यांनी इगो कंपनीच्या लेटरहेडवर रेल्वे पोलीस विभागाला पत्रव्यवहार केले होते. या पत्रव्यवहारात मराठे यांनी म्हटले होते की, बीपीसीएल कंपनीने क्युकॉम या कंपनीस होर्डिंग उभारण्याची परवागनी दिलेली असून त्यास मंजुरी दिल्यास रेल्वे विभागास त्याचा काही फायदा होणार नाही. म्हणून ते क्युकॉम कंपनीस न देता आमच्या इगो मिडीया प्रा.लि. या कंपनीस दिल्यास रेल्वे विभागास फायदा होईल असे म्हटले होते. (Ghatkopar Hoarding Accident)

पत्रात त्यांनी असे नमुद केलेले होते की, सदरच्या जागेमध्ये व्यावसायिक वापरासाठी भरपूर जागा उपलब्ध असल्याने ४० बाय ४० चौ. फुट ऐवजी ८० बाय ८० चौ. फुटाची तीन होर्डिंग करता मागे पुढे परवानगी दिल्यास आपल्या रेल्वे विभागास ४०० टक्के अधिक रेव्हेन्यु प्राप्त होईल. अशा पद्धतीचे पत्र देऊन मराठे यांनी तीन होर्डिंगसाठी मंजुरी प्राप्त करून घेतली होती. निविदा मंजूर झाल्यानंतर निविदेतील अटी व शर्तीचे उल्लंघन करणारे पत्र जान्हवी मराठे यांनी देऊन निविदेत मंजूर असलेल्या जाहिरात फलकाच्या आकारमानाचे सर्वप्रथम उल्लंघन इगो कंपनीच्या तत्कालीन संचालिका जान्हवी मराठे यांनी केले, त्यामुळे मराठे यांचा या गुन्ह्यात मोठा सहभाग असल्याचे विशेष पथकाने म्हटले आहे. (Ghatkopar Hoarding Accident)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.