Ghatkopar Hoarding Accident : दुर्घटनाग्रस्त वाहनधारकांची नुकसान भरपाईसाठी विमा कंपनीकडे धाव

130
Ghatkopar Hoarding Accident : माजी संचालिकेसह दोन जणांना गोव्यातून अटक

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत ज्या वाहनांचे नुकसान झाले, त्या वाहनधारकांची डोकेदुखी वाढली आहे. ज्या वाहनधारकांनी थर्डपार्टी विमा उतरवला आहे, त्या वाहनधारकांना विमा कंपनीने भरपाई देण्यास मना केले आहे. ज्या वाहनांना विमा कंपनीकडून भरपाई मिळणार नाही त्यात सर्वाधिक दुचाकी (मोटारसायकल) वाहनांचा समावेश आहे. (Ghatkopar Hoarding Accident)

घाटाकोपर येथे पेट्रोल पंपावर १३ मे रोजी महाकाय होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत १७ जणांचा बळी गेला आहे, तर ७४ जण जखमी झाले होते. त्याचबरोबर या दुर्घटनेत ४७ दुचाकी, ३९ चारचाकी (मोटार) १० रिक्षांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही वाहने इंधन भरण्यासाठी पेट्रोल पंपावर आलेली होती, त्याचवेळी होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत या वाहनांचा अक्षरशः चेंदामेंदा झालेला आहे. (Ghatkopar Hoarding Accident)

(हेही वाचा – Pune Porsche Car Accident: पुण्यात बुलडोझर पॅटर्न! अवैध पबवर पालिकेची धडक कारवाई)

या दुर्घटनेत बचावलेले तसेच जखमी होऊन बरे झालेले वाहनमालक आपली वाहने ताब्यात घेण्यासाठी तसेच या घटनेत त्यांच्या वाहनाचे नुकसान झाल्याचे कागदोपत्री अहवाल घेण्यासाठी पंतनगर पोलीस ठाण्यात धाव घेत आहेत. तसेच अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकलेली वाहने बाहेर काढण्याची वाट बघत आहे. ज्या वाहनाचे या दुर्घटनेत मोठे नुकसान झाले आहे असे वाहनमालक विमा कंपनीकडून विम्याचे दावे मिळविण्यासाठी धडपड करीत आहे. (Ghatkopar Hoarding Accident)

आपल्या दुचाकी वाहनात पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर रांगेत उभा असलेला प्रवीण कुमार हा सुदैवाने या होर्डिंग दुर्घटनेत (Ghatkopar Hoarding Accident) बचावला परंतु त्याची दुचाकी होर्डिंग खाली आल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. दुर्घटनाग्रस्त झालेल्या दुचाकीच्या नुकसान भरपाईसाठी त्याने दुचाकी विमा कंपनीकडे चौकशी केली असता तेव्हा त्यांना सांगण्यात आले की, त्याच्या वाहनाचा फक्त ‘थर्डपार्टी’ इन्शुरन्स होता, त्यामुळे त्याला नुकसान भरपाई मिळू शकणार नाही. (Ghatkopar Hoarding Accident)

(हेही वाचा – Badminton News : सात्त्विकसाईराज, चिराग पुरुषांच्या दुहेरीत पुन्हा अव्वल)

“मी माझ्या वाहनाच्या विम्याचे पैसे भरले होते, परंतु ‘फर्स्टपार्टी’ विमा असण्याची गरज मला कोणीही दिली नाही, या दुर्घटनेनंतर मला थर्डपार्टी आणि फर्स्टपार्टी विमासंदर्भात कळले. वाहन विम्यावरील समस्या समजून घेण्याचा मी प्रयत्न करत आहे,” असे प्रवीणने म्हटले आहे. प्रवीण कुमार सारखे असे अनेक जण आहे, त्यांना विमा संदर्भात अधिक माहिती नव्हती, किंवा ज्यांना माहित असून देखील ज्यांनी थर्डपार्टी विमा उतरवला असा वाहन मालकांना वाहनाची नुकसान भरपाई मिळू शकत नाही असे एका आरटीओ अधिकाऱ्यांनी संगितले. (Ghatkopar Hoarding Accident)

अधिकाऱ्यांनी असेही म्हटले आहे की, वाहनाच्या फर्स्टपार्टी इन्शुरन्सपेक्षा थर्डपार्टी इन्शुरन्स हे स्वस्त असल्यामुळे दुचाकी (मोटारसायकल) धारक मोठ्या प्रमाणात थर्डपार्टी इन्शुरन्स काढणे पसंत करतात. थर्डपार्टी इन्शुरन्समध्ये केवळ वाहन आणि वाहनचालकाच्या विम्याचा समावेश नसतो, थर्डपार्टी इन्सुरन्स हा केवळ ज्या वाहनांची धडक बसून जो व्यक्ती (मोटारसायकल चालक सोडून) जखमी अथवा मृत होतो, त्यांना विमा कंपनीकडून भरपाई मिळते असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. वाहनांचे इन्शुरन्स काढणे खूप महत्वाचे आहे, ज्या वाहनाचे इन्शुरन्स नसल्यास त्या वाहनधारकाला दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागते असे एका वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. (Ghatkopar Hoarding Accident)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.