Ghatkopar Hoarding Accident : ते तिन्ही मोठे जाहिरात फलक गुरुवारपर्यंत होणार जमीनदोस्त

महानगरपालिका प्रशासनाने छेडा नगर परिसरातील आणखी तीन जाहिरात फलक विनापरवाना उभारण्यात आल्याचे आढळून आले.

511
Hording : मोठ्या जाहिरात फलकांबाबत रेल्वे प्रशासनही आजही उदासिनच, सोमवारी होणार कार्यवाहीची दिशा स्पष्ट

घाटकोपर मधील छेडानगर परिसरात जाहिरात फलक (होर्डिंग) कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेची परवानगी न घेता याठिकाणी उभारण्यात आलेले अन्य तीन जाहिरात फलक हटवण्याची कारवाई युद्धपातळीवर सुरु आहे. वाऱ्याच्या वेगामुळे तोडक कारवाईत बाधा येत आहे. असे असले तरी, दोन जाहिरात फलक बुधवारी १५ मे २०२४ रोजी रात्रीपर्यंत तर एक जाहिरात फलक गुरुवारी १६ मे २०२४ पर्यंत काढण्यात येईल, असे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने कळविण्यात येत आहे. (Ghatkopar Hoarding Accident)

घाटकोपर मधील छेडानगर परिसरात जाहिरात फलक (होर्डिंग) कोसळून झालेल्या दुर्घटनास्थळी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी मंगळवारी भेट देऊन पाहणी केली. घटनास्थळावरील परिस्थितीचा आढावा घेत मुंबईतील अनधिकृत जाहिरात फलकांवर निष्कासन कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले होते. (Ghatkopar Hoarding Accident)

New Project 2024 05 15T183228.342

महानगरपालिका प्रशासनाने छेडा नगर परिसरातील आणखी तीन जाहिरात फलक विनापरवाना उभारण्यात आल्याचे आढळून आले. तीनही जाहिरात फलकांवर निष्कासनाची कारवाई मोहीम मंगळवारी १४ मे २०२४ पासून हाती घेण्यात आली आहे. वाऱ्याच्या वेग, वाहतूक व्यवस्थापन, उपलब्ध मनुष्यबळ यांची सांगड घालून ही कारवाई युद्ध पातळीवर सुरु आहे. (Ghatkopar Hoarding Accident)

(हेही वाचा – AAP : स्वाती मालीवाल यांच्या जीवाला धोका? पतीचा आरोप)

फलकांच्या तोडक कारवाईला वेग

दुर्घटनास्थळी सुरु असलेल्या कार्यात अडथळा न आणता या तीन फलकांच्या तोडक कारवाईला वेग दिला जात आहे. जाहिरात फलकांचे लोखंडी सांगाडे सुटे करण्याचे आणि ते खाली उतरविण्याचे काम अविरत सुरु आहे. आज रात्रीपर्यंत दोन तर एक जाहिरात फलक उद्या निष्कासित करण्यात येतील. सुटे झालेले भाग आणि मलबा तात्काळ वाहून नेण्यात येत असून घटनास्थळ पूर्ववत करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. (Ghatkopar Hoarding Accident)

New Project 2024 05 15T183345.397

एम. एम. मिठाईवाला दुकानावरील अनधिकृत फलक निष्कासित

मालाड (पश्चिम) येथील एम. एम. मिठाईवाला या दुकानावर १५ x १० आकाराचा चहूबाजूने उभारलेला अनधिकृत जाहिरात फलक मंगळवारी १४ मे २०२४ रोजी काढण्यात करण्यात आला. पी उत्तर विभागातील अनुज्ञापन खात्यामार्फत १ निरिक्षक, ४ कामगार यांच्या सहाय्याने ही कारवाई यशस्वीपणे पार पाडण्यात आली. (Ghatkopar Hoarding Accident)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.