Ghatkopar Hoarding Accident : घाटकोपरच्या ‘त्या’ बेकायदेशीर होर्डिंगच्या मंजुरीसाठी आयुक्ताचा अधिकाऱ्यावर दबाव

192
Ghatkopar Hoarding Accident : घाटकोपर होर्डिंग शुल्कापोटी २१.९४ लाखांची थकबाकी

घाटकोपर येथे कोसळलेल्या बेकायदेशीर होर्डिंगच्या मंजुरीवर स्वाक्षरी करण्यासाठी रेल्वेच्या एका पोलीस अधिकाऱ्यावर दबाव टाकण्यात आला होता असा खुलासा संबंधित अधिकाऱ्याने आपल्या जबाबात केला आहे. तत्कालीन रेल्वे पोलीस आयुक्तांनी स्वाक्षरी केलेल्या होर्डिंगच्या मंजुरीवर स्वाक्षरी करायला लावली, स्वाक्षरी केली नाही तर नियंत्रण कक्षात पाठविण्याची धमकी दिल्याचे अधिकाऱ्याने एसआयटीला दिलेल्या जबाबात म्हटले आहे. तत्कालीन पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी इगो मीडियाचे मालक भावेश भिंडे याच्या समोर धमकी देऊन स्वाक्षरी करायला भाग पाडले होते असे जबाबात म्हटले आहे. (Ghatkopar Hoarding Accident)

घाटकोपर येथे १३ मे रोजी रेल्वे पोलिसांच्या जमिनीवर उभारण्यात आलेले बेकायदेशीर महाकाय होर्डिंग कोसळून झालेल्या या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पंतनगर पोलीस ठाण्यात इगो मीडिया कंपनीचा मालक भावेश भिंडे सह संचालक मंडळावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा कक्ष ७ कडे देऊन या तपासासाठी विशेष तपास पथक गठीत करण्यात आले आहे. विशेष तपास पथकाने या घटनेत इगो मीडिया कंपनीचा मालक भावेश भिंडे, माजी संचालिका जान्हवी मराठे, वास्तूविशारद मनोज संघु, सागर पाटील यांना अटक करण्यात होती. दुर्घटनाग्रस्त होर्डिंग ही बेकायदेशीर उभारण्यात आली होती. होर्डिंग ज्या जागेवर उभारण्यात आली होती, ती जागा राज्य शासनानची असून रेल्वे पोलीस कल्याण निधीसाठी ती जागा देण्यात आली होती, त्या जागेवर बेकायदेशीर होर्डिंगला तत्कालीन रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी मंजुरी दिली होती. (Ghatkopar Hoarding Accident)

होर्डिंग लावण्यासाठी इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेडला रेल्वे पोलीस महासंचालक यांनी परवानगी नाकारली असतानाही तत्कालीन रेल्वे पोलीस आयुक्त क्वेसर खालिद यांनी परवानगी दिली. रेल्वे पोलीस विभागाचे प्रशासकीय अधिकारी असलेले पोलीस निरीक्षकांनी या परवानगीवर स्वाक्षरी करण्यास नकार दिल्याने कैसर खालिद यांनी त्यांची बदली नियंत्रण कक्षात करण्याची धमकी दिली, आणि त्यांच्यावर स्वाक्षरीसाठी दबाव टाकला त्यावेळी भावेश भिंडेही तेथे उपस्थित होता, असे प्रशासकीय अधिकारी (रेल्वे पोलीस) यांनी तपास अधिकाऱ्यांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे. (Ghatkopar Hoarding Accident)

(हेही वाचा – Congress च्या नेत्यांमधील हेवेदाव्यांवर पक्षश्रेष्ठी नाराज)

घाटकोपर होर्डिंग कोसळल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने ३२९९ पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात रेल्वे पोलीस प्रशासकीय अधिकारी शहाजी निकम यांच्या जबानीसह १०० हून अधिक जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. निकम यांच्याकडे प्रशासकीय सहायक पोलिस आयुक्त पदाचा कार्यभार असल्याने होर्डिंगला परवानगी देण्यासाठी त्यांची स्वाक्षरी आवश्यक होती. मात्र, त्यांनी स्वाक्षरी करण्यास नकार दिला आणि होर्डिंगसाठी रेल्वे पोलीस महासंचालक कार्यालयाची परवानगी आवश्यक असल्याचे नमूद केले. (Ghatkopar Hoarding Accident)

पदभार सोडण्यापूर्वी खालिद यांनी निकम यांना फोन करून होर्डिंगच्या परवानगीवर स्वाक्षरी करण्यास सांगितले आणि त्यांनी नकार दिल्यास नियंत्रण कक्षात बदली करण्याची धमकी दिली होती. निकम यांनी आरोपपत्रात दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, मी स्वत: स्वाक्षरी केली असेल, तर तुम्हाला स्वाक्षरी करण्यास काय अडचण आहे असे खालिद यांनी म्हटले होते, त्यानंतर निकम यांनी परवानगीच्या कागदपत्रांवर ‘FOR कमिशनर’ लिहून स्वाक्षरी केली. चार्जशीटमध्ये २०० स्क्वेअर फुटांचे होर्डिंग ३३,००० स्क्वेअर फूट कसे झाले याचा तपशीलही देण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या चार आरोपींमध्ये जान्हवी मराठे आणि भावेश भिंडे यांचा समावेश आहे, जे ईजीओ मीडिया कंपनीचे माजी आणि सध्याचे मालक आहेत, ज्यांच्याकडे १४०X१२० फूट होर्डिंग होते. स्ट्रक्चरल सेफ्टी सर्टिफिकेट देणारे मनोज संघू आणि होर्डिंगच्या बांधकामावर देखरेख करणारे सागर पाटील यांचा समावेश आहे. (Ghatkopar Hoarding Accident)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.