Ghatkopar Hoarding Accident : माजी संचालिकेसह दोन जणांना गोव्यातून अटक

185
Ghatkopar Hoarding Accident : माजी संचालिकेसह दोन जणांना गोव्यातून अटक

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने इगो मीडिया कंपनीच्या माजी संचालिका जान्हवी मराठे उर्फ जान्हवी सोनाळकर, सिव्हिल कंत्राटदार सागर पाटील या दोघांना गोव्यातील एका हॉटेलमधून शनिवारी (८ जून) अटक करण्यात आली आहे. रविवारी (९ जून) या दोघांना किल्ला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती विशेष तपास पथकातील अधिकाऱ्यांनी दिली. (Ghatkopar Hoarding Accident)

घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणात आरोपी असलेल्या इगो मीडिया कंपनीच्या माजी संचालिका जान्हवी मराठे उर्फ सोनाळकरने अटकेच्या भीतीमुळे सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतर जान्हवी मराठे फरार झाली होती. गुन्हे शाखेच्या रडारवर असलेली जान्हवी मराठे तिचा साथीदार सागर पाटील सोबत गोव्यात हॉटेलमध्ये लपून बसली असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाला मिळाली. विशेष तपास पथक तिचा माग काढत गोव्यात दाखल झाले होते. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच मराठे आणि पाटील हे दोघे वारंवार जागा बदलत होते. अखेर शनिवारी जान्हवी मराठे आणि सागर पाटील या दोघांना एका हॉटेलमधून अटक करण्यात आली. (Ghatkopar Hoarding Accident)

विशेष तपास पथक या दोघांना घेऊन मुंबईकडे रवाना झाले आहेत. रविवारी या दोघांना किल्ला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणात जान्हवी मराठे ही तिसरी आणि सागर पाटील हा चौथा आरोपी आहे. याआधी मुख्य आरोपी भावेश भिंडेंला अटक करण्यात आली होती. नंतर सिव्हिल इंजिनियर मनोज संघू याला अटक करण्यात आली. हे दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत. जान्हवी मराठे इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेडची संचालिका असताना घाटकोपर होर्डिंगबाबत सर्व कागदपत्रे तयार करून परवानगी मिळवण्यात आली होती. त्यानंतर मराठे हिच्या सांगण्यावरून होर्डिंगच्या बांधकामाचे कंत्राट सागर पाटीलला देण्यात आले होते. (Ghatkopar Hoarding Accident)

(हेही वाचा – राणाभीमदेवी थाटात वक्तव्य करणाऱ्या संजय राऊतांचा भ्रमनिरास झालाय; Pravin Darekar यांचा सणसणीत टोला)

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची माजी संचालिका जान्हवी मराठेचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर तिला अटक करण्यात आहे. तसेच महापालिकेचे अधिकारी आणि रेल्वे पोलीस विभागाच्या लिपिकांना चौकशीला बोलावणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त लखमी गौतम यांनी दिली होती. रेल्वे पोलीस विभागाचे एसीपी शहाजी निकम यांची देखील दोन दिवस चौकशी करण्यात आली आहे. (Ghatkopar Hoarding Accident)

जान्हवी मराठे ही इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन झाल्यापासून डिसेंबर २०२३ पर्यंत कंपनीच्या संचालक पदावर काम करत होती. मराठे संचालिका असताना घाटकोपर येथील दुर्घटनाग्रस्त झालेल्या होर्डिंगसाठी परवानगी मागून ते होर्डिंग बांधण्यात आले होते. तसेच आरोपी मनोज रामकृष्ण संघू (वय ४७) हा मूळचा केरळचा असून त्याने सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. संघूचा जन्म मुंबईत झाला असून तो मुंबईतच वाढला आहे. मात्र, इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला होर्डिंगसाठी स्ट्रक्चर स्टॅबिलिटी सर्टिफिकेट देऊन नियमबाह्य परवानगी दिल्याने मनोज संघू याला शुक्रवारी मुलुंडमधून अटक करण्यात आली होती. (Ghatkopar Hoarding Accident)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.