Ghatkopar Hoarding Accident: होर्डिंग कोसळलेल्या पेट्रोलपंपाला आग, ४० तासांनंतरही बचाव कार्य सुरू

मुंबई महानगरपालिका डिझास्टर अॅक्ट अंतर्गत संबंधित कंपनी आणि रेल्वे प्राधिकरणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

260
Ghatkopar Hoarding Accident: होर्डिंग कोसळलेल्या पेट्रोलपंपाला आग, ४० तासांनंतरही बचाव कार्य सुरू

घाटकोपर इथं पेट्रोलपंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगमुळं १४ जणांचा मृत्यू झाला तर ८८ जण जखमी झाले आहेत. अद्याप या ठिकाणी बचावकार्य सुरू आहे. यादरम्यान पेट्रोलपंपाला आग लागल्याची माहिती समोर आली आहे. होर्डिंग दुर्घटनेच्या ठिकाणी अद्याप बचावकार्य सुरू आहे. यावेळी गॅस कटरचा वापर करत असताना आग लागल्याची घटना समोर आली आहे. काही वेळातच आग नियत्रंणात आणली. (Ghatkopar Hoarding Accident)

होर्डिंग दुर्घटनेला ४० तास उलटून गेले तरीही अद्याप बचावकार्य सुरू आहे. या भीषण दुर्घटनेत आत्तापर्यंत १४ जमांचा मृत्यू झाला आहे. तर ८८ जण जखमी झाले आहेत. या होर्डिंगखाली अद्याप काही जण अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे.

घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी पंतनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पेट्रोलपंप मालक भावेश भिडे आणि जाहिरात कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयपीसी कलम ३०४, ३३८, ३३७, ३४ अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात अधिक तपास पंतनगर पोलीस करत आहे.

(हेही वाचा – Ghatkopar Hoarding Accidentहोर्डिंग कोसळलेल्या पेट्रोलपंपाला आग, ४० तासांनंतरही बचाव कार्य सुरू)

कंपनी आणि रेल्वे प्राधिकरणाविरोधात गुन्हा दाखल
मुंबई महानगरपालिका डिझास्टर अॅक्ट अंतर्गत संबंधित कंपनी आणि रेल्वे प्राधिकरणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (१२० बाय १२० फुटांचा हा बॅनर होता) राज्य सरकारच्या जागेत हा अनधिकृत बॅनर लावल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सर्वच होर्डिंग्जचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्घटनेतील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल, अशी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईतल्या सर्वच होर्डिंग्जचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. त्याचबरोबर अनधिकृत होर्डिंग्ज तातडीने हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.