Ghatkopar Hoarding Accident : जागा कोणाचीही असो, जाहिरात फलक हे महापलिकेच्या मानकांनुसारच हवे! आयुक्तांनी बजावले

मुंबईतील जाहिरात फलक (होर्डिंग) संदर्भात कोणत्या स्वरूपाची कार्यवाही करायची, यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना हाती घेतल्या आहेत.

228
Ghatkopar Hoarding Accident : घाटकोपर होर्डिंग शुल्कापोटी २१.९४ लाखांची थकबाकी
रेल्वे प्रशासनाकडून जाहिरात फलकांच्या आवश्यक त्या सर्व मानकांचे पालन होणे गरजेचे आहे. महापालिकेने ठरवून दिलेल्या मानकांचे पालन न करणारे कोणतेही जाहिरात फलक असतील तरी ते हटवले पाहिजेत. रेल्वे प्रशासनच नव्हे तर अन्य कोणत्याही जागेत जाहिरात फलकांसाठी लागू असलेल्या मानकांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी स्पष्ट केले. (Ghatkopar Hoarding Accident)
(होर्डिंग) परवाना पडताळणी कार्यवाहीला वॉर्ड स्तरावर वेग
मुंबईतील जाहिरात फलक (होर्डिंग) संदर्भात कोणत्या स्वरूपाची कार्यवाही करायची, यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना हाती घेतल्या आहेत. जाहिरात फलक कोणत्याही जागी असोत किंवा कोणाच्याही मालकीची असोत, जी आवश्यक मानके (स्टॅण्डर्डस) महानगरपालिकेने ठरवून दिली आहेत, त्यानुसारच जाहिरात फलक उभारणे गरजेचे आहे. यामध्ये फलकाचा आकार, पाया, संरचनात्मक स्थिरता (स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी), वाऱ्याचा प्रतिरोध टाळण्यासाठी संरचनात्मक व्यवस्था या सर्वांची मानके ठरवून देण्यात आली आहेत. महानगरपालिकेच्या परवानगी घेतलेल्या फलकांसाठी संरचनात्मक स्थिरता परवानगी घेणे गरजेचे आहे. मुंबईत महानगरपालिकेचे परवानाधारक जाहिरात फलक आहेत. खबरदारी म्हणून त्या सर्वांची देखील पुन्हा एकदा विभाग स्तरावर पडताळणी सुरू करण्यात आली आहे, असे देखील आयुक्त भूषण गगराणी यांनी नमूद केले. (Ghatkopar Hoarding Accident)
मानकांचे पालन करणे सर्वांनाच बंधनकारक 
जाहिरात फलक मानकांविषयी बोलताना आयुक्त गगराणी यांनी सांगितले की, महानगरपालिकेने रेल्वे प्रशासनालाही त्यांच्या हद्दीतील जाहिरात फलकांच्या संरचनात्मक स्थिरता पडताळणीसाठी निर्देश दिले आहेत. रेल्वे प्रशासनाकडूनही जाहिरात फलकांच्या आवश्यक त्या सर्व मानकांचे पालन होणे गरजेचे आहे. या मानकांचे पालन न करणारे कोणतेही जाहिरात फलक असतील तरी ते हटवले पाहिजेत. रेल्वे प्रशासनच नव्हे तर अन्य कोणत्याही जागेत जाहिरात फलकांसाठी लागू असलेल्या मानकांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. संरचनात्मक स्थिरता तपासणी व पडताळणी करुन सर्व संबंधितांनी महानगरपालिकेला प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे, असेही आयुक्त श्री. गगराणी यांनी स्पष्टपणे सांगितले. (Ghatkopar Hoarding Accident)
दुर्घटना प्रकरणी गुन्हा दाखल,  व्हीजेटीआय देणार तपासणी अहवाल-
छेडा नगर मधील जाहिरात फलक दुर्घटना प्रकरणी इतर कारवाईविषयी माहिती देताना आयुक्तांनी सांगितले की, सदर दुर्घटनेप्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच, ज्यांनी संरचना स्थिरतेबाबतचे प्रमाणपत्र दिले होते, त्यांच्याकडून महानगरपालिकेने स्पष्टीकरण मागवले आहे. त्याच्यावरही योग्य ती कारवाई करण्यात येईल. (Ghatkopar Hoarding Accident)
दरम्यान, छेडा नगर मधील जाहिरात फलकाविषयीचा तांत्रिक तपासणी अहवाल हा वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था (व्हीजेटीआय) यांचेकडून सादर करण्यात येणार आहे. पाया बांधकाम किंवा संरचनात्मक स्थिरतेचा नेमका काही विषय आहे का? याबाबतचा यथायोग्य अहवाल या तज्ज्ञ संस्थेकडून सादर करण्यात येईल. त्यासाठी व्हीजेटीआय पथकाने घटनास्थळी भेट देऊन तपासणी सुरू केली आहे, अशी माहिती आयुक्त  गगराणी यांनी दिली. (Ghatkopar Hoarding Accident)
पेट्रोल पंपाच्या परवानगीची देखील तपासणी
मुंबईत कोणत्याही व्यवसायासाठी  महानगरपालिकेचा विहित परवाना आवश्यक आहे. त्यानुसार घटनास्थळावर असलेल्या पेट्रोलपंपच्या बांधकामासाठी देखील प्रोव्हिजिनल (तत्वतः) परवाना देण्यात आला होता. पेट्रोलपंप चालवण्याचा विहित परवाना संबंधितांनी प्राप्त केलेला होता की नाही, इत्यादी बाबतची महानगरपालिका प्रशासनाकडून तपासणी करण्यात येणार आहे. त्यानुसार परवाना नसल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही आयुक्त गगराणी यांनी अखेरीस नमूद केले. (Ghatkopar Hoarding Accident)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.