Ghatkopar Hoarding Accident : मुख्य आरोपी भावेश भिंडेला उदयपूर येथून अटक

222
Ghatkopar Hoarding Accident : मुख्य आरोपी भावेश भिंडेला उदयपूर येथून अटक

घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेतील (Ghatkopar Hoarding Accident) आरोपी आणि इगो मीडिया कंपनीचा मालक भावेश भिंडेला राजस्थान राज्यातील उदयपूर येथून एका हॉटेलमधून गुरुवारी अटक करण्यात आली आहे. मुंबई गुन्हे शाखेचे पथक भावेश भिंडे याला घेऊन मुंबईकडे रवाना झाले आहे. घाटकोपर पूर्व येथे सोमवारी दुपारी येथे महाकाय होर्डिंग पडून झालेल्या दुर्घटनेत (Ghatkopar Hoarding Accident) १६ जणांचा बळी गेला होता. या प्रकरणी पंतनगर पोलिसांनी इगो कंपनीचे मालक भावेश भिंडे सह अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या दुर्घटनेनंतर भावेश भिंडे हा मुंबईतून फरार झाला होता. त्याच्या शोधासाठी पंतनगर पोलीस ठाण्याची २ पथके आणि मुंबई गुन्हे शाखेची दोन पथके असे एकूण चार पोलिसांचे पथक भिंडे याचा शोध घेत होते. (Ghatkopar Hoarding Accident)

भिंडे यांचे शेवटचे मोबाईल लोकेशन पुण्यातील लोणावळा येथे दाखवत होते. पोलिसांचे पथक त्या लोकेशनवर पोहचले असता, भावेश भिंडेने तेथून पळ काढला होता. लोणावळा येथून त्याने थेट राजस्थान उदयपूर गाठले, त्या ठिकाणी त्याने भाच्याच्या नावावर एक हॉटेलमध्ये खोली बुक करून त्या ठिकाणी राहत होता. मुंबई गुन्हे शाखेला भावेश भिंडे याचे लोकेशन ट्रेस होताच कक्ष ९ चे पथक उदयपूर येथे रवाना झाले आणि गुरुवारी भावेश भिंडे याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेचे पथक भिंडे याला घेऊन मुंबईकडे रवाना झाले असून शुक्रवारी भिंडेला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. (Ghatkopar Hoarding Accident)

(हेही वाचा – घाटकोपरनंतर Pimpri-Chinchwad शहरात होर्डिंग कोसळले; मात्र मोठी दुर्घटना टळली)

घाटकोपर येथील राज्य लोहमार्ग पोलीस कल्याण निधीसाठी देण्यात आलेल्या जागेवर उभारण्यात आलेले दुर्घटनाग्रस्त महाकाय बेकायदा होर्डिंग हे भावेश भिंडे यांची इगो मीडिया कंपनीचे होते. हे होर्डिंग बेकायदेशीर बांधण्यात आले होते. सोमवारी दुपारी हे महाकाय होर्डिंग पेट्रोल पंपावर पडून झालेल्या मोठी दुर्घटना घडली होती, या दुर्घटनेत १६ जणांचा बळी गेला असून ७० जण जखमी झाले आहे. या होर्डिंगला लोहमार्ग पोलीस तत्कालीन आयुक्त कैसर खालिद यांनी परवानगी दिली होती, दरम्यान कैसर खालिद यांना राज्य पोलिसांकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. (Ghatkopar Hoarding Accident)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.