मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे हद्दीतील नियमबाह्य आकाराचे म्हणजे ४० फूट बाय ४० फूट पेक्षा अधिक आकाराचे सर्व जाहिरात फलक रेल्वे प्रशासनाने तातडीने हटवावेत, या आशयाची नोटीस मुंबई महानगरपालिका प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अंतर्गत कलम ३० (२) (व्ही) अन्वये मुंबई जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष या नात्याने महापालिका अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी बजावली आहे. (Ghatkopar Hoarding Accident)
महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार मुंबईतील रेल्वेच्या हद्दीतील पहिल्या टप्प्यात ९९ जाहिरात फलकांची (होर्डिंग) यादी बनवण्यात आली. यासर्व होर्डिंगकरता तिन्ही रेल्वेच्या मार्गावरील रेल्वेचे व्यवस्थापक तसेच संबंधितांना महापालिकेच्या वतीने नोटीस पाठवून हे सर्व होर्डिंग त्वरित काढण्याचे कळविण्यात आले आहेत. (Ghatkopar Hoarding Accident)
(हेही वाचा – Narendra Modi : नकली सेनेने राहुल गांधींना सावरकरांविषयी चार शब्द बोलायला लावावे; पंतप्रधान मोदींचे आव्हान)
मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाला नोटीस
मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाला आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अंतर्गत कलम ३० (२) (व्ही) अन्वये नोटीस बजावली आहे. मुंबई जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या नात्याने महानगरपालिकेने मध्य आणि पश्चिम रेल्वेचे विभागीय अभियंता यांना ही नोटीस पाठविली आहे. रेल्वे प्रशासनाच्या हद्दीत नियमबाह्य आकाराचे म्हणजे ४० फूट बाय ४० फूट पेक्षा अधिक आकाराचे जाहिरात फलक असल्यास ते तातडीने काढण्याचे निर्देश या नोटीसीद्वारे देण्यात आले आहेत. (Ghatkopar Hoarding Accident)
मुंबईची भौगोलिक स्थिती तसेच समुद्र किनाऱ्याला लागून असलेला प्रदेश लक्षात घेता पर्यायाने हवामान व वाऱ्याची स्थिती पाहता ४० फूट बाय ४० फूट पेक्षा अधिक आकाराचे जाहिरात फलक लावण्यास महानगरपालिका प्रशासन (Municipal Administration) परवानगी देत नाही. असे असताना रेल्वे प्रशासनाच्या हद्दीत महानगरपालिका रस्ते तथा खासगी जागा बांधकामे यांच्या लगतच्या ठिकाणी नियमबाह्य आकाराचे जाहिरात फलक उभारल्याचे आढळून आले आहे. हे पाहता घाटकोपरमध्ये घडलेल्या दुर्घटनेसारखा प्रसंग पुन्हा ओढावू नये यासाठी रेल्वे प्रशासनाच्या हद्दीतील ४० फूट बाय ४० फूट पेक्षा अधिक आकाराचे सर्व जाहिरात फलक तातडीने काढण्याचे निर्देश मुंबई जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष या नात्याने अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या स्वाक्षरीनिशी या नोटीसीतून देण्यात आले आहेत. (Ghatkopar Hoarding Accident)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community