Ghatkopar Hoarding Accident : होर्डिंगच्या मार्फत लोहमार्ग पोलिसांना मिळाले 11 लाख रुपये

Ghatkopar Hoarding Accident : या होर्डिंगच्यामार्फत लोहमार्ग पोलिसांच्या खात्यात लाखो रुपये जमा होत होते, अशी माहिती तपासात समोर आली आहे.

142
Ghatkopar Hoarding Accident : आपदग्रस्तांना अधिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार - अनिल पाटील

मुंबईतील घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांची संख्या आता 16 वर गेली आहे. या प्रकरणी सध्या चौकशी सुरु आहे. या प्रकरणातील आरोपी भावेश भिंडे सध्या अटकेत आहे. या प्रकरणात सध्या रेल्वेचे साहाय्यक पोलीस आयुक्त शहाजी निकम यांची सलग दोन दिवस चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या होर्डिंगच्यामार्फत (Ghatkopar Hoarding Accident) लोहमार्ग पोलिसांच्या खात्यात लाखो रुपये जमा होत होते, अशी माहिती तपासात समोर आली आहे.

(हेही वाचा – Jitendra Awad यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी; डॉ. राजू वाघमारे यांची मागणी)

साईज वाढवून केली 140×120 

7 डिसेंबर 2021 पर्यंत पहिले तीन होर्डिंग 40×40 या आकाराचे होते. मात्र त्यानंतर त्याचा आकार 80×80 करण्यात आली. 19 डिसेंबर 2022 मध्ये जे पडलं ते चौथं होर्डिंग, त्याची साईज ही 140×120 करण्यात आल्याची माहिती निकम यांनी चौकशीत दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणात साहाय्यक पोलीस अधिकारी शहाजी निकम यांची चौकशी बुधवारी पूर्ण झालेली आहे. आतापर्यंत सात जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.

पहिल्या तीन होर्डिंगमधून 13 लाख रुपये

पहिल्या तीन होर्डिंगच्या तुलनेत चौथ्या म्हणजेच पडलेल्या होर्डिंगमधून सर्वाधिक रक्कम लोहमार्ग पोलिसांच्या खात्यात जमा झाल्याचं तपासात उघड झाले आहे. पहिल्या तीन होर्डिंगमधून 13 लाख रुपये उत्पन्न मिळत होते. चौथ्या होर्डिंगमधून म्हणजेच जे होर्डिंग पेट्रोल पंपावर पडले, त्या एकाच होर्डिंगमार्फत 11 लाखाहून अधिक रक्कम ही लोहमार्ग पोलिसांच्या खात्यात जमा होत होती.

पहिल्या तीन होर्डिंगच्या आधारेच भावेश भिंडेला चौथ्या होर्डिंगसाठी परवानगी देण्यात आली होती. तत्कालिन पोलिस आयुक्त कैसर खालिद यांच्या सांगण्यावरून ही परवानगी देण्यात आली. होर्डिंगचं 10 वर्षाचं कंत्राटही कैसर खालिद यांच्या सांगण्यावरून 7 जुलै 2022 रोजी वाढवल्याची माहिती निकम यांनी चौकशीत दिली आहे. (Ghatkopar Hoarding Accident)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.