मुंबईतील घाटकोपरमध्ये होर्डिंग (Ghatkopar Hoarding Accident) कोसळून मोठी दुर्घटना घडली. होर्डिंग दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढून आता 17 वर पोहोचला आहे. या दुर्घटनेने अनेक निष्पापांचा बळी घेतला. प्रशासनाने या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन एसआयटीची स्थापना केली आहे. मुंबई गुन्हे शाखेचे सहआयुक्त लखमी गौतम यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. (Ghatkopar Hoarding Accident)
भिंडेच्या कार्यालयातून कागदपत्रं जप्त
तपासादरम्यान भावेश भिंडेच्या कार्यलयातून कागदपत्र जप्त करण्यात आली असून पुढे तपास सुरुच आहे. या प्रकरणासाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटी पथकामध्ये एकूण 6 अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांच्या देखरेखीखाली गुन्हे शाखेच्या कक्ष-७ चे प्रभारी निरीक्षक महेश तावडे पथकाचे नेतृत्व करणार आहेत. पोलीस निरीक्षक आत्माजी सावंत हे या प्रकरणाचे तपास अधिकारी असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान या प्रकरणात भावेश भिंडेची (Bhavesh Bhinde) आर्थिक बाजू तपासली जात असून, त्यास परवानगी कोणी दिली याचाही तपास सुरु आहे. भिंडेच्या कार्यालयातून कागदपत्रं जप्त करण्यात आली असून, त्यानुसार तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. (Ghatkopar Hoarding Accident)
मृतांचा आकडा आता 17 वर
या दुर्घटनेमध्ये सुरुवातीला 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर जखमींपैकी आणखी दोघांचा मृत्यू झाला होता. तर आता मृतांमध्ये आणखी एक आकडा वाढला आहे. ज्यामुळे मृतांचा आकडा आता 17 झाला आहे. परळ, येथील केईएम रुग्णालयात उपचार घेणाऱ्या राजु मारूती सोनावणे (Raju Maruti Sonawane) या रिक्षाचालकाचा मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. अजुनही या दुर्घटनेतील चार रुग्णांवर केईएम रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती मिळत आहे. (Ghatkopar Hoarding Accident)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community