Ghatkopar Hoarding दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेचे शेवटचे लोकेशन लोणावळा; मुंबई पोलिसांचे पथक मागावर

137
Ghatkopar Hoarding दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेचे शेवटचे लोकेशन लोणावळा; मुंबई पोलिसांचे पथक मागावर
Ghatkopar Hoarding दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेचे शेवटचे लोकेशन लोणावळा; मुंबई पोलिसांचे पथक मागावर

Ghatkopar Hoarding दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेचे शेवटचे लोकेशन लोणावळा; मुंबई पोलिसांचे पथक मागावर
घाटकोपरमधील दुर्घटना (Ghatkopar Hoarding) घडल्यानंतर याप्रकरणातील आरोपी भावेश भिंडे बेपत्ता आहे. पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जातो आहे. मात्र, भावेश भिंडेच्या (Bhavesh Bhinde) शेवटच्या लोकेशनबाबत आता माहिती पुढे आली आहे. त्याचे शेवटचे लोकेशन लोणावळ्यात असल्याचे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. (Ghatkopar Hoarding)

भावेश भिंडेला पकडण्यासाठी ७ पथके तयार

‘द इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, घाटकोपरमधील दुर्घटनेनंतर पोलिसांनी त्याच्या (Bhavesh Bhinde) मुलूंड येथील घरी जाऊन त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी तो घरी आढळून आला नाही. ज्यावेळी पोलिसांनी त्याचे शेवटचे लोकेशन शोधले, त्यावेळी त्यांना त्याचे शेवटचे लोकेशन लोणावळ्यात असल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांचे एक पथक भावेश भिंडेचा शोध घेण्यासाठी लोणावळ्यात दाखल झाले. मात्र, त्याला पकडण्यात पोलिसांना यश आलं नाही. यासंदर्भात बोलताना पोलिसांनी सांगितले की, भावेश भिंडेचे शेवटचे लोकेशन आम्हाला लोणावळ्यात आढळून आले होते. मात्र, त्यानंतर त्याचा फोन बंद आहे. त्याला पकडण्यासाठी ७ पथके तयार करण्यात आली आहेत. त्याचा शोध सुरू असून लवकरच त्याला अटक केली जाईल. (Ghatkopar Hoarding)

भावेश भिंडे नेमका कोण आहे?

घाटकोपरच्या पूर्व द्रुतगती मार्गावर लावलेले होर्डिंग कोसळले होते. या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. हे होर्डिंग ‘इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीने लावले होते. भावेश भिंडे (Bhavesh Bhinde) हा या कंपनीचा संचालक आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला असून ७५ जण जखमी झाले आहेत. (Ghatkopar Hoarding)

लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सर्वात मोठे होर्डिंग म्हणून नोंद

या दुर्घटनेनंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) एक निवेदन जारी करून हे जाहिरात फलक त्यांच्या परवानगीशिवाय बांधण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. BMC ने जारी केलेल्या निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, पंत नगर येथील ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील पेट्रोल पंपावर असलेले हे होर्डिंग हे अनधिकृत असून यासाठी महापालिकेने परवानगी दिलेली नव्हती. हे होर्डिंग सुमारे १७,०४० स्क्वेअर फूट मोठे असून याची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सर्वात मोठे होर्डिंग म्हणूनही नोंद केली गेली होती. (Ghatkopar Hoarding)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.