घाटकोपर होर्डिंग प्रकरणातील (Ghatkopar hoarding case) आरोपी भावेश भिंडे (Bhavesh Bhinde) याला सत्र न्यायालयातून जामीन मंजूर झाला आहे. बेकायदेशीर असलेलं होर्डिंग कोसळल्यामुळे 17 जणांचा मृत्यू झाला होता तर 80 हून अधिक जण या प्रकरणात जखमी झाले होते. होर्डिंग लावणाऱ्या इगो कंपनीचा मालक याला पोलिसांनी 17 मे रोजी अटक केली होती. मात्र आता भावेश भिंडेची जामिनावर सुटका झाली आहे.(Ghatkopar hoarding case)
(हेही वाचा-Nanded मध्ये कट्टरपंथींकडून महादेव मंदिराची विटंबना)
भावेश भिंडे या प्रकरणात उच्च न्यायालयातही गेला होता. यावेळी उच्च न्यायालयात त्याने ही अटकच बेकायदेशीर असल्याचा मुद्दा मांडला होता. मात्र उच्च न्यायालयाने ही अटक योग्य असल्याचे सांगत त्याच्या या मुद्द्याला फेटाळून लावले. त्यानंतर भावेश भिंडे याने पुन्हा एकदा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. हा अर्ज आता मंजूर झाला आहे. (Ghatkopar hoarding case)
(हेही वाचा-Veer Savarkar अवमान; आरोग्यमंत्री दिनेश गुंडू राव यांना नोटीस; १५ दिवसांत माफी मागा, अन्यथा…)
घाटकोपर होर्डिंग प्रकरण हे नैसर्गिक रित्या घडले असून ही देवाची करणी असल्याचे त्याने कोर्टाला सांगितले होते. यामध्ये कोणाचाही मृत्यू व्हावा असा माझा हेतू नव्हता अशी बाजू कोर्टात मांडण्यात आली होती. अखेर त्याची जामिनावर सुटका झाली आहे. सत्र न्यायालयाचे न्यायाधीश बी एम पाठाडे यांनी हा आदेश दिला आहे. (Ghatkopar hoarding case)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community