घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेतील (Ghatkopar Hoarding) मृतांचा आकडा 17 वर पोहोचला आहे. होर्डिंग दुर्घटनास्थळी अद्यापही मोठ्या प्रमाणात लोखंडी ढिगारा आहे. लोखंडी ढिगाऱ्याखाली ३० ते ४० जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे अजून अपघातातील मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. पेट्रोल पंपावर होर्डिंग (Ghatkopar Hoarding) पडलं, तिथे मोठ्या प्रमाणात लोखंडी ढिगारा असून तो उपसण्याचं काम सुरु आहे. ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती असल्याने बचावकार्य सुरु आहे. बचावकार्याला आणखी 24 तास लागणार असल्याचं सांगितलं जात आहे. (Ghatkopar Hoarding)
५० तास उलटून गेले
घाटकोपरच्या होर्डिंग (Ghatkopar Hoarding) दुर्घटनेला 50 तास उलटून गेले आहेत. अजून देखील NDRF आणि महापालिका आपत्ती सेवा, अग्निशमन दलांकडून बचावकार्य सुरूच आहे. आतापर्यंत 50 टक्के ढिगारा उपसण्याचं काम पूर्ण झालं असून 50 टक्के काम बाकी आहे. ढिगाऱ्याखालून 25 दुचाकी आणि 10 चारचाकी वाहने बाहेर काढल्या आहेत. याठिकाणी एक जोडपं आणि एक वाहन चालक असे एकूण 3 जण अडकले असून त्यांना जेसीबीच्या माध्यमातून बाहेर काढण्याचं काम NDRF जवानांच्या माध्यमातून केला जात आहे. बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. (Ghatkopar Hoarding)
फलक हटवण्यास इतका वेळ का?
ज्वलनशील पदार्थांच्या साठ्यामुळे बचाव मोहिमेत काळजीपूर्वक हाताळणी केली जात आहे. लोखंडी खांब कापताना ठिणगी उडून आगीसारखी दुर्घटना घडू नये यासाठी विशेष खबरदारी बाळगावी लागत आहे. ती घेऊनही बुधवारी (१५ मे) सकाळी काम सुरू असताना अचानक तेथे आग लागलीच. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच पाण्याचा मारा केल्याने ही आग तत्काळ आटोक्यात आली आणि त्यानंतर काम पुन्हा सुरू झाले. (Ghatkopar Hoarding)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community