मुंबईसह उपनगरात (Suburbs Mumbai) सोमवारी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या वादळी वाऱ्यात घाटकोपर येथील एक भलंमोठं होर्डिंग (Ghatkopar Holdings) पेट्रोल पंपावर (Petrol Pump) कोसळल्यामुळे दुर्घटना घडली. होर्डिंग कोसळल्यानंतर त्याखाली अनेक गाड्या आणि लोक दबली गेली. आतापर्यंत या दुर्घटनेत मृतांचा आकडा अंदाजे १४ झाल्याची माहिती आहे. तर आता पर्यंत ३१ जणांना घरी सोडण्यात आले आहे. होर्डिंग खाली आणखी जखमी रुग्ण आढळण्याची शक्यता आहे. तसेच अग्निशामक दलासोबत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (एमएमआरडीए) कारागिरांची टीम धावून आली आहे. पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी MMRDA ने अत्याधुनिक उपकरणांसह सुमारे ६० जणांचे पथक घटनास्थळी पाठविले आहेत.
(हेही वाचा – IPL 2024 : हे इंग्लिश स्टार खेळाडू टी-२० विश्वचषकाच्या तयारीसाठी मायदेशी परत, बंगळुरूला बसणार मोठा फटका )
छेडानगर (Chhedanagar) येथे बचावासाठी विविध यंत्रणांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू असून, त्याला एमएमआरडीएनेही मदतीचा हात दिला आहे. मेट्रो ४ मार्गिकेच्या अमर महल साइटवरील ६० जणांचे पथक या घटनेत मदतकार्यात एमएमआरडीएने पाठविले. त्यामध्ये आपत्कालीन परिस्थितीत मदतकार्य राबविण्यात प्रावीण्य असलेल्या २५ तज्ज्ञ कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे एमएमआरडीएकडून सांगितले जात आहे. त्याचबरोबर या बचावकार्यासाठी ४ हायड्रा क्रेन, ५०० मेट्रिक टन वजनाच्या २ क्रेन, ४ गॅस कटर यंत्रणेसह आवश्यक मशिनरी घटनास्थळी पाठविली आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्यांनी दिली.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community