घाटकोपर भागात होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत ४७ नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. मुंबई पोलीस, महापालिका, आपत्ती व्यवस्थापन असे विभाग समन्वय साधून असून, अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्धस्तरावर करण्यात येत आहेत. जखमींवर राजावाडी रुग्णालयात उपचार करण्यात येत असून, त्यांना सर्वतोपरी सहाय्य करण्यात येईल. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले आहे.
घाटकोपर भागात होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 47 नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. मुंबई पोलिस, महापालिका, आपत्ती व्यवस्थापन असे विभाग समन्वय साधून असून, अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्धस्तरावर करण्यात येत आहेत. जखमींवर राजावाडी रुग्णालयात उपचार करण्यात…
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) May 13, 2024
मुंबईतील घाटकोपर येथे लोखंडी होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्र्यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. होर्डिंग दुर्घटनेनंतर त्यांनी प्रशासनाला उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे सांगितले आहे.
(हेही वाचा – State Bank Jobs : स्टेट बँक करणार १५,००० जणांची नोकरभरती)
या घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १०० हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती असून आतापर्यंत जवळपास ५० जखमींना बाहेर काढण्यात यश आले आहे. जखमींना उपचारांसाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच होर्डिंगखाली अडकलेल्या इतर नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत.
होर्डिंग मालकावर कारवाई केली जाईल – मुख्यमंत्री
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही घाटकोपर येथे भेट देऊन दुर्घटनेचा आढावा घेतला. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, “घाटकोपर इथं झालेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेबाबतची माहिती मिळताच मी महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांना बचावकार्याचे आदेश दिले. आतापर्यंत अनेक जखमींना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सदर होर्डिंग अनधिकृत होते की नाही, याबाबत माझ्याकडे माहिती नाही. मात्र हे होर्डिंग अनधिकृत असेल तर होर्डिंग मालकावर कारवाई केली जाईल. तसंच वादळ-वाऱ्यात होर्डिंग कोसळू नये; म्हणून शहरातील सर्व होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना मी आयुक्तांना दिल्या आहेत. ठरवून दिलेल्या आकारापेक्षा मोठे होर्डिंग लावू नयेत, महापालिकेचा परवाना असल्याशिवाय अशी होर्डिंग उभारली जाऊ नयेत, यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.”
हेही पहा –
Join Our WhatsApp Community