मुंबईकरांनो (Mumbai) तुम्ही जर मेट्रोने (Metro) प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी. गुरुवारी 19 जानेवारी रोजी घाटकोपर मेट्रो ( Ghatkoper Metro) सायंकाळी 5:45 ते सायंकाळी 7:30 या दरम्यान बंद राहणार आहे. काही ऑपरेशनल आणि प्रशासकीय कामांसाठी मेट्रो बंद ठेवली जाणार आहे. त्यामुळे मेट्रोने प्रवास करणा-या प्रवाशांनी यावेळी त्यांच्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहनही मेट्रोकडून करण्यात आले आहे.
….म्हणून बंद असणार मेट्रो सेवा
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) विविध विकासकामांच्या उद्घाटनांसाठी 19 जानेवारी म्हणजेच गुरुवारी मुंबईत दौ-यावर येत आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते मेट्रो 2A आणि मेट्रो 7 ला हिरवा कंदिल दाखवण्यात येईल. त्यांच्या या दौ-याच्या पार्श्वभूमीवर सध्या मुंबईमध्ये जोरदार तयारीही सुरु आहे. याच दौ-यादरम्यान वांद्रे- कुर्ला संकुलामध्ये (BKC) असणा-या मैदानात त्यांची जाहीर सभाही होणार आहे.
पंतप्रधानाच्या दौ-यामुळे वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गांवरील मेट्रो सेवा यामुळे प्रभावित होणार आहे. ज्यामुळे ती सायंकाळी 5:45 ते 7:30 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. मेट्रो वनकडून ही माहिती देण्यात आली आहे.
( हेही वाचा: पुण्यातील जुना बाजार येथील दुकानांना मोठी आग )