Ghazwa-e-Hind : भारताच्या इस्लामीकरणाची चिथावणी; सौदी अरेबियाच्या प्रिन्सचे विधान चर्चेत

Ghazwa-e-Hind : संपूर्ण जगासाठी आणि सर्व धर्मांसाठी खुले असलेल्या उदारमतवादी इस्लामकडे आम्ही परत जात आहोत. आम्हाला आशा आहे की, प्रत्येक जण सहकार्य करेल", असे सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमानम्हणाले आहेत. 

286
Ghazwa-e-Hind : भारताच्या इस्लामीकरणाची चिथावणी; सौदी अरेबियाच्या प्रिन्सचे विधान चर्चेत...
Ghazwa-e-Hind : भारताच्या इस्लामीकरणाची चिथावणी; सौदी अरेबियाच्या प्रिन्सचे विधान चर्चेत...

सहारनपूर (उत्तरप्रदेश) येथील दारुल उलूम देवबंद (Darul Uloom Deoband) या इस्लामिक शिक्षणसंस्थेने भारताला गझवा-ए-हिंद (Ghazwa-e-Hind) बनवण्याचे प्रक्षोभक विधान केले आहे. या पार्श्वभूमीवर इस्लामी देश असलेल्या सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांचे विधान चर्चेत आले आहे.

(हेही वाचा – Ashwini Vaishnav: बुलेट ट्रेन प्रकल्पाला उशीर होण्याला ठाकरे सरकार जबाबदार, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची टीका)

उदारमतवादी इस्लामच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न

२०१७ मध्येच सौदी अरेबियाचे (Saudi Arabia) युवराज मोहम्मद बिन सलमान (Mohammed bin Salman) यांनी सौदी अरेबियाला उदारमतवादी इस्लामकडे वळवण्याचे वचन दिले आहे. सौदी अरेबियाला कट्टर इस्लामी विचारधारेतून खुल्या समाजाकडे नेण्यासाठी त्यांनी जागतिक पाठबळही मागितले. “अनेक कट्टरतावाद्यांनी वेढलेला सौदी अरेबिया आता सामान्य देश राहिलेला नाही. गेल्या 30 वर्षांत जे काही घडले, ते सौदी अरेबियाची ओळख नाही. गेल्या 30 वर्षांत या प्रदेशात जे घडले, ते मध्यपूर्वेची ओळख नाही. आता त्यातून बाहेर पडण्याची वेळ आली आहे. संपूर्ण जगासाठी आणि सर्व धर्मांसाठी खुले असलेल्या उदारमतवादी इस्लामकडे आम्ही परत जात आहोत. आम्हाला आशा आहे की, प्रत्येक जण सहकार्य करेल”, असे युवराज म्हणाले आहेत.

एकीकडे इस्लामी देशांची अशी भूमिका राहिलेली असतांना भारतातील धर्मांधांनी धर्मनिरपेक्ष असलेल्या भारतात जिहादची भाषा चालू केली आहे, ही देशाची कट्टरतेकडे वाटचाल आहे, अशी चर्चा सामाजिक माध्यमांतून चालू आहे.

गझवा-ए-हिंद म्हणजे काय ?

गझवा-ए-हिंद म्हणजे भारतीय उपखंडात रहाणाऱ्या काफिरांवर विजय मिळवणे. गझवा-ए-हिंदमध्ये ‘गझवा’ म्हणजे इस्लामचा प्रसार करण्यासाठी लढलेले युद्ध. सोप्या शब्दात सांगायचे, तर गझवा-ए-हिंद म्हणजे युद्धात विजय मिळवून भारताचे इस्लामीकरण करणे. (Ghazwa-e-Hind)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.