Ghazwa-e-Hind : काफिर हिंदूंशी युद्धाचे समर्थन, भारताचे इस्लामीकरण; देवबंदवर काय होणार कारवाई ?

Ghazwa-e-Hind : दारुल उलूम देवबंदने आपल्या संकेतस्थळाद्वारे गझवा-ए-हिंदला मान्यता देणारा फतवा जारी केला होता. सहारनपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी देवबंदवर आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

210
Ghazwa-e-Hind : काफिर हिंदूंशी युद्धाचे समर्थन, भारताचे इस्लामीकरण; देवबंदवर काय होणार कारवाई ?
Ghazwa-e-Hind : काफिर हिंदूंशी युद्धाचे समर्थन, भारताचे इस्लामीकरण; देवबंदवर काय होणार कारवाई ?

सहारनपूर (Saharanpur) येथील दारूल उलूम देवबंदने गझवा-ए-हिंदला (Ghazwa-e-Hind) पाठिंबा देणारा फतवा जारी केल्याने राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने (एनसीपीसीआरने) कारवाईचे निर्देश दिले आहेत. जिल्हा दंडाधिकारी दिनेश चंद्र सिंह यांनी सांगितले की, याविषयी वरिष्ठ पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवण्यात आले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी देवबंदवर कारवाईचे आदेश

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) सहारनपूर येथील दारुल उलूम देवबंद (Darul Uloom Deoband) या इस्लामिक शिक्षण केंद्राने गझवा-ए-हिंदला मान्यता देणारा फतवा जारी केला होता. यानंतर एनसीपीसीआरने पत्र लिहून कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. सहारनपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी देवबंदवर आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. दारुल उलूम देवबंदने आपल्या संकेतस्थळाद्वारे गझवा-ए-हिंदला मान्यता देणारा फतवा जारी केला होता.

(हेही वाचा – Blackmailing Case : हॉटेल व्यावसायिकाला ब्लॅकमेल करून १५ कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या सेक्रेटरीला अटक)

गझवा-ए-हिंद म्हणजे काय ?

गझवा-ए-हिंद म्हणजे भारतीय उपखंडात रहाणाऱ्या काफिरांवर विजय मिळवणे. गझवा-ए-हिंदमध्ये ‘गझवा’ म्हणजे इस्लामचा प्रसार करण्यासाठी लढलेले युद्ध. सोप्या शब्दात सांगायचे, तर गझवा-ए-हिंद म्हणजे युद्धात विजय मिळवून भारताचे इस्लामीकरण करणे.

जिल्हा दंडाधिकारी दिनेश चंद्र सिंह यांनी सांगितले की, एनसीपीसीआरकडून (NCPCR) सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानंतर या संदर्भात वरिष्ठ पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवण्यात आले आहे. देवबंदच्या सी.ओ.एस.डी.एम.ला देखील या प्रकरणात त्वरित कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई केली जाईल. एनसीपीसीआरने म्हटले आहे की, हे मुलांच्या विकासासाठी योग्य नाही आणि हे लक्षात घेऊन कारवाईसाठी एक पत्र पाठवण्यात आले होते, जे त्यांना प्राप्त झाले आहे आणि कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. पथकासह अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे. (Ghazwa-e-Hind)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.