या गावाला रस्तेच नाहीत, फक्त पाणीच पाणी

128

गाव म्हटलं की मातीचे रस्ते, पायवाट, डोंगर, झाडी या सर्व गोष्टी आल्याच. गावातल्या पायवाटेने चालताना किती मजा येते ना? पण जर आम्ही तुम्हाला सांगितलं की जगामध्ये असं एक गाव आहे, जिथे रस्तेच नाहीत तर तुम्ही काय म्हणाल?

( हेही वाचा : स्वाईन फ्लूने वाढवले पुणेकरांचे टेन्शन; रुग्णसंख्येत वाढ)

हे गाव असं आहे वाचकांनो जिथे कोणत्याही प्रकारच्या गाड्या चालवता येत नाहीत. तुम्हाला कुठे जायचं असेल तर होडीने जावं लागतं. हे अजब गाव आहे नेदरलॅंडमध्ये. नेदरलॅंडच्या ओव्हराअयसेल प्रांतात गिथॉर्न नावाचं गाव आहे. या गावात रस्ते नाहीत.

गावाच्या चारही बाजूला ६ किलोमीटरचा कालवा आहे. या मार्गाने बोटीद्वारे लोक सगळीकडे प्रवास करतात. या गावात रस्ते नसले तरी हे मागासलेल गाव नाही बरं का… अतिशय सुंदर आणि शांत, निसर्गरम्य असं हे ठिकाण आहे. लोक फिरण्यासाठी या जागेची निवड करतात.

जरी गावात रस्ते नसले तरी लोकांकडे गाड्या आहेत. मात्र गावाच्या बाहेर आपल्या गाड्या लावतात आणि तिथून दुसरीकडे जाण्यासाठी ते गाड्यांचा वापर करतात. मात्र गावात फिरायचं असेल तर रस्ते नसल्यामुळे बोटीनेच प्रवास करावा लागतो.

इथे रस्ते नसले, पायवाट नसली तरी लाकडाचे पूल बनवले आहेत, जेणेकरुन लोक एका ठिकाणाहून दुसरीकडे पायी चालत जाऊ शकतात. या गावचे लोक सुखी आणि समाधानी आहे. इथली लोकसंख्या सुमारे ३ हजार एवढी आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.