स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शिक्षण घेतलेल्या शाळेस Veer Savarkar यांची मूर्ती भेट

111

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (Veer Savarkar) यांना त्यांच्या बालपणात भगूर (नाशिक) येथील जिल्हा परिषद प्राथमिक विद्या मंदिरात शाळेत ९ सप्टेंबर १८८९ साली दाखल करण्यात आले होते, त्याला सोमवार, ९ सप्टेंबर २०२४ रोजी १३५ वर्षे पूर्ण झाली. या ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधून, मुंबई येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने तसेच सावरकरांचे नातू रणजित सावरकर आणि स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेला स्वातंत्र्यवीर सावरकरांची मूर्ती व पुस्तके भेट देण्यात आली.

(हेही वाचा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी केंद्रीय गृहमंत्री Amit Shah यांनी घेतले गणरायाचे दर्शन)

शाळेच्या मुख्याध्यापिका शैलेजा सैंदाणे व संजय वाघ यांनी शाळेच्या वतीने ही मूर्ती स्वीकारली. प्रसंगी सावरकरांच्या (Veer Savarkar) देशभक्तीचा वारसा पुढे चालवण्याचा आणि त्यांच्या विचारांना पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा महत्त्वाचा संदेश दिला गेला. यावेळी स्मारकाचे मनोज कुवर, भूषण कापसे, भाऊसाहेब ससाणे, शंकर मुंढारे, गौरव राजगुरू, सार्थक मरकड, ललित भदाणे आदी मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या महान योगदानाची आठवण करून देणारा आणि त्यांच्या विचारांच्या प्रचाराची दिशा दाखवणारा ठरला.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.