शिंदे-फडणवीस सरकारकडून पोलिसांना गिफ्ट; नैमित्तिक रजा वाढवल्या

कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांना शिंदे-फडणवीस सरकारने मोठे गिफ्ट दिले आहे. राज्यातील पोलीस शिपाई ते पोलीस निरीक्षक यांच्या नैमितिक रजा १२ वरून २० इतक्या वाढविण्याचा निर्णय बुधवारी,  मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

पाचव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना एक वर्षात १२ ऐवजी ८ रजा मंजूर करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता आणि त्याअनुषंगाने विशेष बाब म्हणून पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना १२ दिवस नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आल्या. मात्र, पोलिसांवरील कामाचा वाढता ताण, विविध सण आणि उत्सवाच्या अनुषंगाने बंदोबस्त, व्हीआयपी ड्युट्या यामुळे या नैमित्तिक रजा आणखी वाढवून २० दिवस करण्याची विशेष बाब म्हणून मंजूर करण्यात आली.

(हेही वाचा 40 महिन्यांत पहिल्यांदाच बँकांमध्ये रोख रक्कमेचा तुटवडा, काय आहे कारण?)

पोलीस भरती वेगाने आणि पारदर्शी व्हावी

  • ७५ हजार पोलिसांची भरती करण्याबाबत शासनाने घोषणा केली आहे. ही प्रक्रिया वेगाने आणि पूर्णपणे पारदर्शी व्हावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
  • सध्या ७,२३१ पदे भरतीच्या जाहिरातीची प्रक्रीया सुरु असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. भरतीच्या वेळी लेखी परिक्षेच्या अगोदर शारीरिक चाचणी घेण्यात येईल.
  • यासाठी मुंबईतील २० मैदानांवर संपूर्ण तयारी करा. तसेच मैदानांवर कॅमेऱ्यांची यंत्रणा तयार ठेवा.
  • कुठल्याही परिस्थितीत संपूर्ण पारदर्शी पद्धतीने ही प्रक्रिया झाली पाहिजे आणि कुठलीही तक्रार करता येता कामा नये, अशा सूचनाही उप मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here