Jharkhand मध्ये होळीच्या दिवशी मशिदीसमोर हिंदूंवर हल्ला

31
Jharkhand मध्ये होळीच्या दिवशी मशिदीसमोर हिंदूंवर हल्ला
Jharkhand मध्ये होळीच्या दिवशी मशिदीसमोर हिंदूंवर हल्ला

झारखंडमधील (Jharkhand) गिरिडीह (Giridih) जिल्ह्यातील घोराथांबा येथे होळीच्या दिवशी दि. १४ मार्चला एका मिरवणुकीदरम्यान हिंदूंवर (Hindu) हल्ला करण्यात आला. हा हल्ला मशिदी असणाऱ्या ठिकाणी झाला या हिंसाचारात ज्या घरांवर दगडफेक झाली ती घरे मुस्लिमांची आहेत. ज्यांनी हल्ला केला ते मुस्लिम (Muslim) होते. त्यामुळे मशिद असलेल्या रस्त्यावर हिंदूंच्या मिरवणुकीला लक्ष्य करणे, मागील रस्त्यावरील मंदिरावर हल्ला करणे, दगडफेक करणे आणि पोलिसांच्या वाहनांना लक्ष्य करणे, अशा अनेक आरोप एफआयआरमध्ये नमुद करण्यात आले आहेत.

( हेही वाचा : Mumbai Airport वर कस्टम विभागाची कारवाई ३.६७ कोटी रुपयांचे सोने केले जप्त, चौघांना अटक

दरम्यान याप्रकरणात पोलिसांनी ११ हिंदूंना आरोपी ठरवले आहे. ज्यामुळे पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. प्रशासनावर हिंदूंना लक्ष्य केल्याचा आरोपही झारखंडचे विरोधी पक्षनेते बाबूलाल मरांडी (Babulal Marandi) यांनी केला आहे.

हिंदूंवर पेट्रोल बॉम्ब आणि विटांनी धर्मांध मुस्लिमांचा हल्ला

एफआयआरमध्ये दिलेल्या माहितीनुसार, दि. १४ मार्च रोजी संध्याकाळी १५-२० जण होळी खेळणारे मशिद असणाऱ्या गल्लीतून जात होते. परंतु नमाजची वेळ झाल्याने त्यांना अडवण्यात आले. त्यावेळी होळी खेळणाऱ्या लोकांनी सांगितले की, होळी दरवर्षी याच मार्गाने जाते. पण तरीही रस्ता अडवण्यात आला. यानंतर धर्मांध मुस्लिम (Muslim) लोकांनी पेट्रोल बॉम्ब, बाटल्या, विटा आणि दगडांनी हल्ला करण्यास सुरुवात केली. बाजार चौकाजवळ पेट्रोल बॉम्ब फेकून अनेक दुकाने, दुचाकी आणि वाहने जाळण्यात आली.

तसेच एफआयआरमध्ये सांगितले आहे की, धर्मांध मुस्लिम जमावाने मंदिरावर हल्ला केला. दगडफेक करण्यात आली आणि पोलिस आल्यावर त्यांच्या गाड्या पेटवून देण्यात आल्या. या हिंसाचारात चार पोलिस जखमी झाले. धनवार बीपीओ कम मॅजिस्ट्रेट सुरेंद्र कुमार वर्नवाल (Surendra Kumar Varnwal) यांनी एफआयआर दाखल केला आहे. त्यातही तुष्टीकरणाचे राजकारण करत पोलिसांनी ११ हिंदूंनाच (Hindu) आरोपी ठरवले आहे. मात्र हिंदूंचे (Hindu) म्हणणे आहे की, हल्ला मुस्लिम (Muslim) लोकांकडून करण्यात आला. मग ते मशीद असलेल्या रस्त्यावर हिंदूंच्या (Hindu) मिरवणुकीवर हल्ला असो किंवा त्याच्या मागे असलेल्या रस्त्यावरील मंदिरावर हल्ला असो.

तरीही एफआयआरमध्ये ३९ हिंदूंची (Hindu) आणि ४१ मुस्लिमांची नावे समाविष्ट करून संपूर्ण प्रकरण संतुलित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हे स्पष्ट आहे की, या कारवाईमुळे धर्मांधांचे मनोबल वाढेल आणि भविष्यात हिंदूंवर हल्ले करण्यास प्रोत्साहन मिळेल. कारण सणांच्या वेळी हिंदूंवर (Hindu) हल्ले होत आहेत आणि नंतर त्यांच्यावरच आरोप केले जात आहेत.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.