Expiry date उलटलेलं चॉकलेट खाल्ल्यानंतर दीड वर्षाच्या मुलीसोबत घडलं असं काही!

335
Expiry date उलटलेलं चॉकलेट खाल्ल्यानंतर दीड वर्षाच्या मुलीसोबत घडलं असं काही!
Expiry date उलटलेलं चॉकलेट खाल्ल्यानंतर दीड वर्षाच्या मुलीसोबत घडलं असं काही!

पंजाबमध्ये (Punjab) एक गंभीर (Expiry date ) प्रकार घडला आहे. एका दीड वर्षांच्या मुलीने कालबाह्य झालेले चॉकलेट (Expiry date ) खाल्ल्यानंतर तिला रक्ताच्या उलट्या सुरू झाल्या. त्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पंजाबच्या पटियाला येथील एका किराणा दुकानातून सदर चॉकलेट(Expiry date ) खरेदी करण्यात आले होते. या प्रकरणानंतर पोलीस आणि आरोग्य विभागाने एकत्रित केलेल्या चौकशीत सदर चौकलेट कालबाह्य (Expiry date ) झाल्याचे निदर्शनास आले.

चॉकलेट खाल्ल्यामुळे रक्ताच्या उलट्या

मुळचे लुधियानाचे असलेले मुलीचे कुटुंबीय पटियाला येथे आपल्या नातेवाईकांच्या घरी गेले होते. नातेवाईक असलेल्या विकी गेहलोत यांनी जवळच्या किरणा दुकानातून एक चॉकलेटचा बॉक्स आणून लहान मुलीला दिला होता. घरी आल्यानंतर मुलीने बॉक्समधील चॉकलेट खाल्ले असता तिच्या तोंडातून रस्तस्त्राव व्हायला लागला. यानंतर तिला तात्काळ जवळच्या वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. विषारी तत्व असलेले चॉकलेट खाल्ल्यामुळे रक्ताच्या उलट्या झाल्याचे वैद्यकीय चाचणीतून निष्पन्न झाले. (Expiry date )

दुकानदाराने कालबाह्य झालेले पदार्थ विकले

या प्रकारानंतर मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसांमध्ये आणि राज्याच्या आरोग्य विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. यानंतर आरोग्य विभागाच्या पथकाने तक्रारदारासह किराणा दुकानात धडक दिली आणि चॉकलेटचे नमुने गोळा केले. सदर दुकानदाराने कालबाह्य झालेले पदार्थ विकले असल्याचे आरोग्य विभागाच्या तपासणीत आढळून आले. दुकानातील इतर कालबाह्य झालेला मालही जप्त करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास सुरू आहे. (Expiry date )

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.