कोकणात वंशाच्या ‘पणती’ सर्वाधिक

सरकार, सामाजिक संस्था यांनी केलेल्या उपाययोजनांमुळे अलिकडे मुलींच्या जन्मदरात वाढ

मुलींचा जन्मदर वाढण्यासाठी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ यांसारखे अनेक उपक्रम सरकारकडून राबवले जातात. गेल्या काही वर्षांपासून वंशाला दिवा हवा, घर केवळ मुलगाच संभाळू शकतो समाजातील या विचारांमुळे मुलींचा जन्मदर हा कमी झाल्याचे दिसून आले होते. पण सरकार, सामाजिक संस्था यांनी केलेल्या उपाययोजनांमुळे अलिकडे मुलींच्या जन्मदरात वाढ होऊन, मुलींचे स्वागत होताना दिसत आहे. राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार कोकण विभागातील कन्याधन वाढले आहे.

दिलासादायक चित्र

राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार २०१५-१६ च्या तुलनेत २०१९-२० मधील मुलींचा जन्मदर वाढल्याचे दिसत आहे. ठाण्यातील प्रति एक हजार मुलांमागे मुलींचा जन्मदर ९८२, पालघरमध्ये ९६३ आणि रायगडमध्ये हा दर सर्वाधिक १००३ इतका आहे. यामुळे सर्व स्तरातून कोकण विभाग कौतुकास पात्र ठरत आहे. एक हजार मुलांमागे ९५० मुली हा जन्मदर समाजाच्या स्वास्थ्याच्या आणि वैद्यकीय दृष्टिकोनातून महत्त्वाचा निर्देशांक मानला जातो. पाच वर्षापूर्वी याच अहवालाच्या स्थिती चिंताजनक होती. परंतु यंदाच्या अहवालाचे चित्र दिलासादायक आहे.

(हेही वाचा -पेन्शनधारकांना खुशखबर! घरी बसून द्या हयातीचे प्रमाणपत्र!)

सामाजिक जागृती

सामाजिक संस्था, सरकारमार्फत राबवलेल्या उपाययोजनांमुळे मुलींचा जन्मदर आकडा सुखावणारा आहे. कोरोना काळात कोकण विभागातील मुलींचा जन्मदर कमी न होता वाढला आहे ही गोष्ट सुखावणारी आहे. तसेच, मुलींच्या कर्तृत्वामुळे समाजाच्या मानसिकतेमध्ये बदल होत आहे असे मत आरोग्य विभागाच्या उपसंचालक गौरी राठोड यांनी व्यक्त केले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here