महामेट्रोच्या कंत्राटी कामगारांना न्याय द्या; मंत्री Akash Fundkar यांच्या सूचना

45
महामेट्रोच्या कंत्राटी कामगारांना न्याय द्या; मंत्री Akash Fundkar यांच्या सूचना
  • प्रतिनिधी

महामेट्रोच्या व्यवस्थापनाने नागपूर मेट्रो प्रकल्पातील कंत्राटी कामगारांना केंद्र सरकारने निर्धारित केलेल्या किमान वेतनानुसार न्याय द्यावा, अशा स्पष्ट सूचना कामगार मंत्री आकाश फुंडकर (Akash Fundkar) यांनी दिल्या.

नागपूर मेट्रो रेल प्रकल्पात कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि अन्य समस्यांबाबत कामगार मंत्री फुंडकर (Akash Fundkar) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस आमदार प्रविण दटके, कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, महामेट्रोचे महाप्रबंधक सुधाकर उराडे, कामगार विभागाचे वरिष्ठ अधिकारी, कामगार संघटनांचे प्रतिनिधी तसेच दूरदृश्यप्रणालीद्वारे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर उपस्थित होते.

(हेही वाचा – DCM Eknath Shinde यांची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका; म्हणाले, बाळासाहेबांच्या विचारांना…  )

कंत्राटी कामगारांच्या वेतनासंदर्भात स्पष्टता

महामेट्रो अंतर्गत कार्यरत कंत्राटी कामगारांची नोंदणी केंद्रीय कामगार प्राधिकरण आणि राज्य शासनाच्या कामगार विभागाकडे करण्यात आलेली आहे. मात्र, त्यांच्या वेतनासंदर्भात न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याने महामेट्रो व्यवस्थापनाने याबाबत तत्काळ कार्यवाही करावी आणि कंत्राटी कामगारांना शासननिर्धारित किमान वेतन मिळेल याची हमी द्यावी, असे निर्देश मंत्री फुंडकर (Akash Fundkar) यांनी दिले.

(हेही वाचा – Champions Trophy 2025 : …तर भारतीय खेळाडूंची पत्नी चॅम्पियन्स करंडकासाठी दुबईला जाऊ शकते!)

राज्यातील मेट्रो प्रकल्पांमध्ये वेतन एकसंध करण्याचा निर्णय

राज्यात विविध ठिकाणी सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पांमध्ये (एमएमआरडीए, एमआरसीएल, पीएमआरडीए) कंत्राटी कामगारांच्या वेतनात एकसूत्रता असावी, यासाठी लवकरच एक व्यापक बैठक घेतली जाणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणानुसार कंत्राटी कामगारांना योग्य वेतन मिळावे, यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे मंत्री फुंडकर (Akash Fundkar) यांनी सांगितले.

महामेट्रो कंत्राटी कामगारांचा वेतन प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी आगामी बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.